घोडाझरी येथे पर्यटनासाठी गेलेल्या इसमाचा बुडून मृत्यू..!!!

0
492

नागभीड:
संततधार पावसाने नागभीड तालुक्यातील ब्रिटिश कालीन घोडाझरी तलाव ओव्हरफ्लो झाला. आणि याचा मनसोक्त आनंद लुटण्यासाठी संपूर्ण विदर्भातून पर्यटक या ठिकाणी येत आहेत.. आज दि. 28 जुलै 2022 रोजी नागभीड तालुक्यातील चिंधचक येथील इसम पर्यटनासाठी गेला असता त्याचा बुडून मृत्यू झाला.
सदर इसमाचे नाव मधुकर कामडी वय (45) वर्ष चिंधीचक येथील रहिवासी आहे.


सदर घटनेची माहिती कुटुंबियांना मिळताच त्यांनी मृतदेहाला बाहेर काढले व घटनेची माहिती वनविभाग व पोलीस विभाग यांना देण्यात आली.
पुढील तपास पोलीस विभाग करीत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here