स्वाब नेचर केअर संस्था’ द्वारे घोडाझरी तलाव परिसरात स्वच्छता

0
650

 

तळोधी (बा.)
‘स्वाब’ नेचर केअर संस्था द्वारे नागभीड तालुक्यातील, घोडाझरी अभयारण्यातील सुप्रसिद्ध घोडाझरी  तलाव परिसरातील प्लास्टिक पिशव्या, बाटल्या, पत्रावळी, प्लास्टिक कचरा गोळा करून  अभयारण्य परिसर स्वच्छ व प्रदुषणमुक्त केला.


पावसाळा सुरू झाला आणि आपल्या व्यस्त जीवनातून थोडेफार वेळ  मिळाले की लोक निसर्गातील पर्यटन स्थळे , डोंगर,  तलाव झरणे , बघण्यास उत्साहाने सहपरिवार आणि मित्र-मैत्रिणींसोबत भटकंती करायला जातात. आणि निसर्गाचा भरपूर आनंद घेत आयुष्यात काही  आनंदाचे क्षण जोडत असतात.
मात्र ज्या पर्यावरणात निसर्गात लोक आनंद शोधायला जातात मात्र आपल्या निष्काळजीपणा आणि मूर्खपणामुळे तेच लोक त्या परिसराचा विनाश करायलाही मागे पुढे पाहत नाही.  पर्यटक पर्यटनाला तर जातात मात्र ज्या ठिकाणी पर्यटनाला जातात तो परिसर नेहमीच प्रदूषित करत असतात. आणि यामध्ये सुशिक्षित उच्चभ्रू , पर्यटक नेहमीही दारू पिऊन पार्ट्या  करणारे पर्यटन निसर्गात जास्त प्रमाणात प्रदूषण करत असतात. दारू पिऊन झाल्यानंतर दारूच्या रिकाम्या बाटल्या, प्लास्टिकचे दारू प्यायची ग्लास, चखना खाऊन झाल्यानंतरच्या प्लास्टिक पिशव्या, आणि जेवणानंतर  प्लास्टिक पात्रळी हे संपूर्ण पर्यटनाला गेलेल्या ठिकाणीच ठेवले जातात. कसलाही विचार प्रदूषण करताना लोक करत नाही. मात्र याच प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये,  काचांच्या बाटल्यांमध्ये अडकून पक्षी, सरीसृप प्राणी, आपला जीव गमावतात. आणि प्लास्टिक पडलेल्या जागेवर बियाणेही वापरत नाही त्यामुळे पर्यावरणाचा फार मोठं नुकसान होत असतो.
मात्र सतत या समस्येकडे गांभीर्याने बघणारी, निसर्ग चे संवर्धन करून संरक्षण करण्याकरीता धडपडणारी ‘स्वाब नेचर केअर संस्था’ नेहमीच जंगल परिसर तलाव परिसर, पर्यावरणातील पर्यटनाचे ठिकाण, डोंगर परिसर, ज्या ठिकाणी पर्यटक प्लास्टिक कचरा करतात त्या आपल्या परिसरातील प्रत्येक ठिकाणी जाऊन महिन्याला ‘पर्यावरण प्लास्टिक मुक्त अभियाना’ अंतर्गत परिसरात पडलेल्या संपूर्ण प्लास्टिक पिशव्या, दारूच्या बाटल्या, गोळा करून त्यांचा योग्य विल्हेवाट लावून परिसर प्लास्टिक मुक्त करत असते.
याच अंतर्गत स्वाब संस्था द्वारे आज घोडाझरी  तलावाचा परिसरही स्वच्छ करण्यात आला. व तेथील पर्यटकांना पर्यावरण प्रदूषण, प्लास्टिक प्रदूषण करू नये व पर्यावरण संवर्धन आणि संरक्षणामध्ये आम्हाला सहकार्य करावे असे अनुरोध येथील पर्यटकांना करून प्लास्टिक प्रदूषणाचे निसर्गाला होणारे घातक परिणाम समजण्यात आले.
‘प्लास्टिक मुक्त पर्यावरण’ या अभियान परिसरातील तलाव, पर्यटन स्थळे, निसर्ग रम्य स्थळे  प्रत्येक महिन्याला  स्वच्छ व प्रदुषणमुक्त करन्याचे अभियान  ‘स्वाब नेचर केअर संस्था’ सातत्याने राबवित आहे. त्याच परिसर स्वच्छता अभियान अंतर्गत  स्वच्छता अभियान राबवून घोडाझरी अभयारण्यातील मुख्य प्रवेशद्वार ते तलाव परिसर आज प्लास्टिक कचरा मुक्त करण्यात आले. यावेळी संस्थेचे संस्थापक/ अध्यक्ष यश कायरकर, उपाध्यक्ष स्वप्णिल बोधनकर, सह सचिव हितेश मुंगमोडे, सदस्य विकास बोरकर, वेदप्रकाश मेश्राम, महेश बोरकर, प्रशांत सहारे, सुरज गेडाम,कृणाल रामटेके, वैभव बोरकर, छत्रपती रामटेके, सुरज भाकरे,  तर वनविभाग तर्फे लटपटे, वनरक्षक मांगरुड बिट,  कुथे वनरक्षक नागभीड , तुषार गजबे, क्षितीज गरमडे यांनी या स्वच्छता अभियानात सहभाग घेतला व सहकार्य केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here