
चंद्रपूर (मोहम्मद सुलेमान बेग):
जगप्रसिद्ध ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात झपाट्याने वाढलेल्या वाघांच्या संख्येमुळे ताडोबातील दोन वाघांना NTCA च्या अनुमती नुसार मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पश्चिम महाराष्ट्रातील सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात सोडण्यात येणार असून या करिता ताडोबा प्रशासनातर्फे हालचाली सुरू झाले आहे.
सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात एक ही वाघ नाही व त्याचे अस्तित्व कायमस्वरूपी टिकवून ठेवण्यासाठी राज्याच्या वनविभागाने हे पाऊल उचलले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार पहिल्या टप्प्यात दोन वाघ सोडण्यात येत असून व त्यानंतर सहा वाघ असे एकूण आठ वाघ सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात सोडण्यात येणार आहे व तसेच या प्रकल्पासाठी प्राधीकरणाकडून १०.५०कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत.
यासंदर्भात ताडोबात येणाऱ्या पर्यटकांशी वनसमाचार च्या प्रतिनिधींनी संवाद साधल्यास ते म्हणाले “ताडोबा सफारी दरम्यान दिसणाऱ्या वाघांना शिफ्ट न करता ज्याठिकाणी मानव वन्यजीव संघर्षाचे प्रमाण वाढलेले आहेत. त्या परिसरातील वाघांना जेरबंद करून इतर व्याघ्र प्रकल्पात सोडण्यात यावे यावर ताडोबा प्रशासनाने विचार करण्याची गरज आहे”.
