एका अज्ञात वाहनाच्या धडकेत नर सांबर ठार :तळोदी बाळापुर वनपरिक्षेत्रातील घटना

0
142

यश कायरकर (जिल्हा प्रतिनिधी):

तळोदी बाळापुर वनपरिक्षेत्र अंतर्गत येणाऱ्या गोविंदपुर नियत क्षेत्रातील सारंगगड बीट, कक्ष क्र. 65 जवळील तळोधी- सोनापूर – नेरी रस्ता लगत एका अज्ञात वाहनाच्या धडकेत एक अंदाजे ५ वर्षे वय असलेला नर सांबर मृत झाल्याची घटना आज दि. 25 मार्च 2024 रोजी सकाळच्या सुमारास गस्तीवर असलेले वनरक्षक यांच्या निदर्शनास आले.
सदर घटनास्थळी मौका पंचनामा करून तात्काळ मृत सांबराला सावरगाव येथील रोपवाटिके मध्ये आणून शवविच्छेदन करून त्याला  अग्नीच्या स्वाधीन करण्यात आले व तसेच अज्ञात वाहना विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास तळोधीचे वनपरिक्षेत्र अधिकारी अरुप कन्नमवार यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे.
अशा प्रकारचे वन्यप्राण्यांचे रोड अपघात आपण नेहमीच होत असल्याचे बघतो यात कधी कधी  ससे तर सांबर व चितळ अपघातात  मारले जातात असेच काही दिवसापूर्वी नवरगाव नेरी रोडवर सुद्धा एक चितळ मृत झाल्याची घटना उधडकीस आली होती. या मार्गाने पहाटेच्या वेळेस रेती तस्करी करणारे किंवा इतर वाहने देखील भर धाव वेगाने जंगलाच्या रस्त्यातून येणे जाणे करत असतात. त्यामुळे रस्त्यात अचानक आलेल्या वन्यजीवांचा अपघात होऊन मृत्यूच्या घटना हा सतत घडत असतात. त्यामुळे वन विभागाने या रस्त्यावर जागोजागी तसेच सूचना फलक लावणे गरजेचे झालेले आहे. तसेच जंगला लगतच्या या रस्त्यांमध्ये गतिरोधक सुद्धा असणे आवश्यक आहे असे वन्यजीव प्रेमींचे मागणी आहे.

सदर घटनेच्या वेळेस वनपरिक्षेत्र अधिकारी अरुप कन्नमवार तथा पशुवैद्यकीय अधिकारी, गोविंदपुरचे  क्षेत्र सहाय्यक आर.एस. गायकवाड, गोविंपूरचे वनरक्षक पी.एम. श्रिरामे, येनुली माल च्या वनरक्षक के.आर. सिंग मैडम, तळोधी चे वनरक्षक राजेंद्र भरणे, ‘स्वाब’ संस्थेचे  यश कायरकर , नितीन भेंडाळे ,गोपाल कुंभले, गिरिधर निकुरे, कैलास बोरकर इत्यादी सदस्य व वनमजूर उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here