विदर्भातील वनखात्यात मोठा बदल :प्रधान मुख्य वनसंरक्षक व उप वनसंरक्षकांच्या बदल्या

0
561

महित गुप्ता प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव), तर एम. श्रीनिवास रेड्डी चंद्रपूर वनअकॅडमी चे संचालक म्हणून नियुक्त

चंद्रपूर:  दि. २९ सप्टेंबर २०२२ रोजी प्रधान व अपर प्रधान मुख्य वनसंरक्षकांसह उप वनसंरक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहे.
सदर बदल्यामुळे विदर्भातील वन खात्यात मोठा बदल झाले असल्याचे दिसून येत आहे.
चंद्रपूर येथील वन ॲकॅडमी चे संचालक तथा अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक (संशोधन, शिक्षण व प्रशिक्षण) महिम गुप्ता यांची प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) म्हणून पदोन्नती करण्यात आली आहे. तर महाराष्ट्र वनविकास महामंडळ, नागपूरचे मुख्य महाव्यवस्थापक एम. श्रीनिवास रेड्डी यांची नियुक्ती चंद्रपूर वन अकॅडमीच्या संचालक पदी करण्यात आली आहे.
नागपूर PCCF (कार्मिक) विकास गुप्ता यांची बदली महाराष्ट्र राज्य वन विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक म्हणून नागपूर येथेच नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक (संधारण) शोमीता विश्वास यांची PCCF (कार्मिक) म्हणून पदोन्नती करण्यात आली आहे.
शोमीता विश्वास यांच्याकडे असलेला अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक (संधारण) नागपूरच्या कार्यभार त्यांनी पी. कल्याणकुमार तसेच अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक (अकाष्ठ वनोपज) नागपूर या पदाचा अतिरिक्त कार्यभार डॉ. प्रवीण चव्हाण यांच्याकडे देण्यात आले आहे व तसेच श्रीनिवास रेड्डी यांच्या बदलीमुळे रिक्त होणाऱ्या त्यांच्या सध्याच्या पदाचा कार्यभार संजीव गोरे यांच्याकडे देण्यात आले आहे.

तसेच जगप्रसिद्ध ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प चे उपसंचालक बफर जी गुरुप्रसाद यांची बदली कोल्हापूर येथे उपवनसंरक्षक (प्रादेशिक) म्हणून करण्यात आली आहे. तर उपसंचालक (कार्य आयोजना) चे डॉ. विनीता व्यास यांची बदली नागपूर येथील महाराष्ट्र राज्य जैवविविधता महामंडळाचे संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
अकोट उप वनसंरक्षक (वन्यजीव) एस. नवकिशोर रेड्डी यांची बदली सावंतवाडी येथील उपवनसंरक्षक (प्रादेशिक) येथे करण्यात आली आहे.
महाराष्ट्र वन विकास महामंडळ मार्कंडा स्थित बल्लारशा येथील विभागीय व्यवस्थापक कुशाग्र पाठक यांचे ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे उपसंचालक (बफर) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
महाराष्ट्र वन विकास महामंडळ, भंडारा व्यवस्थापक नितीन कुमार सिंग यांची धुळे येथील उपवनसंरक्षक (प्रादेशिक) म्हणून बदली करण्यात आली आहे.
यावला उपवनसंरक्षक (प्रादेशिक) एच.एस. पद्मनाभा यांची नियुक्ती कोल्हापूर येथे उपवनसंरक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. विदर्भातील वन खात्यात मोठा बदल दिसून येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here