जागतिक व्याघ्र दिनानिमित्त शेत शिवारात जाऊन मार्गदर्शन; स्वाब संस्थेचा एक वेगळा उपक्रम

0
127

तळोधी (बा.);
आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिनानिमित्त ‘SWAB Foundation’ संस्थेच्या सदस्यांनी शेतशीवारात जाऊन मानव वन्यजीव संघर्ष टाळण्यासाठी शेतात काम करणाऱ्या शेतकऱ्याना मार्गदर्शन केले. तळोधी (बा.) वन परिक्षेत्रातील परिसरातील  सावरला,आकापुर, उश्राळा (मेंढा), गंगासागर हेटी च्या शेत शिवारा लगत वाघाचे वास्तव्य असल्याने व पंधरवाड्या पुर्वी आकापुर येथील एक महिलेचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याची घटना समोर असल्याने लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अशा वेळेस त्या परिसरात गस्त करून शेतशिवारात काम करणाऱ्या मजुरांशी, महिलांशी शेताच्या बांधावर जाऊन वाघापासून बचाव करण्यासंदर्भात मार्गदर्शन करून कशा प्रकारे सावधानता बाळगून आपले प्राण वाचवता येतील व मानव वन्यजीव संघर्ष टाळता येईल, याबाबत सूचना देण्यात आले व सोबतच पर्यावरण व मानवी जीवनामध्ये वाघांचे काय महत्त्व आहे याबाबत त्यांना सविस्तर माहिती देण्यात आले. तसेच शेतात काम करत असताना किंवा या परिसरामध्ये वावरताना काही महत्त्वाच्या काळजी घेण्याच्या सूचना SWAB Foundation चे अध्यक्ष यश कायरकर यांनी मार्गदर्शन करताना केले.


तसेच पावसाळ्याचा दिवस असल्यामुळे घर परिसरात किंवा शेत परिसरामध्ये काम करताना कचऱ्यामध्ये सुद्धा सर्पदंश होण्याच्या घटना खूप वाढलेले आहेत त्यामुळे त्यापासून ही बचाव  करण्याबाबतचे मार्गदर्शन केले तसेच मांत्रिकाच्या नादी न लागता तात्काळ रुग्णालयात जाऊन औषध उपचार करण्याची फार गरज असते किंवा काही घटना घडल्या तर आम्हाला किंवा वनविभागाला त्याबाबत तात्काळ सूचना दिल्यास तुमचे अनमोल असे प्राण निश्चितच वाचवण्यात मदत होईल. सापाबद्दलही त्या मजुरांना जीवेस सयाम, यश कायरकर, महेश बोरकर यांनी मार्गदर्शन केले.

यावेळी संस्थेचे अध्यक्ष यश कायरकर, सदस्य जिवेश सयाम, हितेश मुंगमोडे, महेश बोरकर , प्रशांत सहारे, वेदप्रकाश मेश्राम,आकाश मेश्राम ,नितीन भेंडाळे ,शुभम सूरपाम, गणेश गुरूनुले, शुभम निकेसर, विशाल बारसागडे, विकास लोणबले, तुषार शिवणकर, कुणाल रामटेके , गौरव निकुरे, गंगासागर हेटी बिटचे वनरक्षक  भरने आदि उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here