वाघिणीला जेरबंद करण्यात वन विभागाला यश; शेतमजुरांनी घेतला वाघाच्या दहशती पासून सुटकेचा श्वास

0
173

चंद्रपूर (मोहम्मद सुलेमान बेग): मध्यचांदा वनविभाग चंद्रपूर परिक्षेत्र पोंभुर्णा उपक्षेत्र घोसरी, नियतक्षेत्र दिघोरी अंतर्गत मौजा ठाणेवासना शेतशिवार झगडकर रीठ, पिंपरी देशपांडे, गोवर्धन, दिघोरी, नवेगाव मोरे जिथे वाघांचा अधिवास आहे आणि मानवी वस्तीच्या अगदी जवळ असून या परिसरात गावकरी व शेतमजूर काम करतात. बरेचदा शेतात काम करताना वाघ दिसतात त्यामुळे गावकरी घाबरले असून त्यांनी शेतात काम करणे बंद केले होते.

सद्य:स्थितीत शेतालगतच्या संरक्षित जंगलात पाळीव प्राण्यांवर होणारे हल्ले व हत्या, मानव-प्राण्यांची होणारी हानी आणि  वनविभागा विरुद्ध होणारा जन आक्रोश  रोखण्यासाठी ग्रामस्थांच्या मागणीनुसार दि.  23 जुलै 2023 रोजी  मुख्य वनसंरक्षक चंद्रपूर वनविभाग चंद्रपूर व उपवनसंरक्षक चांदा वनविभाग चंद्रपूर यांच्या मार्गदर्शनाखाली ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प चंद्रपूरच्या पथकाने पोंभुर्णा परिक्षेत्रातील वनकर्मचाऱ्यांसोबत वाघांचा नियमित शोध घेण्यासाठी एक टीम तयार करण्यात आली. दि. 29 जुलै 2023 रोज शनिवार दुपारच्या सुमारास वाघाच्या मागोवा घेत असताना कक्ष क्र. 553 B रोपवन क्षेत्रामध्ये वाघ दिसून आला. तेव्हा वन अधिकारी यांचे आदेशानुसार त्याचे सहकारी
डॉ.रविकांत खोब्रागडे यांनी गुंगीचे औषध भरलेले इंजेक्शन तयार करून अजय मराठे शूटर यांना दिले व त्यांनी वाघिणीवर नेम धरून अचूक निशाणा साधला व वाघिणीला बेशुद्ध करण्यास आर. आर. टी. ला यश प्राप्त झाले. यावेळेस अमोल कोरपे (ड्रायव्हर), अक्षय दांडेकर (ड्रायव्हर), रेंज ऑफिसर पोंभुर्णा व त्यांची टीम व वनमजुरांनी मिळून वाघाला जेरबंद करण्यात आले.
मिळालेल्या माहीती नुसार डॉ.रविकांत खोब्रागडे पशुवैद्यकीय अधिकारी वन्यजीव चंद्रपूर  यांनी आज पर्यंत 57 वाघाला जेरबंद करण्यात यश मिळाले आले.

सदर वाघीण ही सब एडल्ट (sub adult) असून मौजा ठाणेवासना शेतशिवार झगडकर रीठ, पिंपरी देशपांडे, गोवर्धन दिघोरी, नवेगाव मोरे या गावातील लोकांनी व शेतावर काम करणाऱ्या शेतमजुरांनी वाघाच्या दहशती पासून सुटकेचा श्वास घेतला व  वनविभागाचे आभार मानले.

वैद्यकीय तपासणी दरम्यान वाघ शारीरिक दृष्ट्या तंदुरुस्त असल्याचे आढळून आले. संध्याकाळी ते परिपूर्ण वन्यजीव उपचार केंद्रात नेण्यात आले आणि नंतर नागपूरच्या गोरेवाडा प्राणी संग्रहालयात पाठवण्यात आले.

सदर कारवाई डॉ. जितेंद्र रामगावकर मुख्य वनसंरक्षक चंद्रपूर वनवृत्त चंद्रपूर,  श्वेता बोड्डु उप वनसंरक्षक मध्ये चांदा वनविभाग चंद्रपूर तसेच श्रीकांत पवार सहायक वनसंरक्षक मध्य चांदा वनविभाग चंद्रपूर यांच्या मार्गदर्शनाखाली फनिंद्र गादेवार वनपरिक्षेत्र अधिकारी पोंभुर्णा, राहुल घाईत परीक्षाविधीन वनक्षेत्रपाल, अजय बोधे क्षेत्र सहाय्यक घोसरी, सुरज मेश्राम वनरक्षक आणि पोंभुर्णा परिक्षेत्रातील कर्मचाऱ्यांनी दिवस-रात्र मेहनत करून वाघिणीला जेरबंद करण्याची कारवाई पूर्ण केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here