बिबट्या रोड़ क्रॉस करताना बाईक सवार पोलीस कर्मचारी अपघातात ठार

0
1022


चंद्रपूर वरून ड्युटी करून घरी आपल्या बाईकने परत येत असताना बल्लारपूर टोलनाका महामार्गावरील पावर हाऊस जवळ बिबट्या रोड क्रॉस करीत असताना बाईक सवार पोलीस कर्मचारी अपघातात ठार झाल्याची घटना आज दिनांक 4 डिसेंबर 2021 रोजी दुपारी 1 वाजताच्या सुमारास घडली. मृतक पोलीस कर्मचारी चे नाव ASI अविनाश पडोळे आहे.

अविनाश पडोळे हे चंद्रपूरच्या पोलीस अधिक्षक कार्यालयात बिनतारी संदेश वहन विभागात कार्यरत होते. अविनाश पडोळे ड्युटी वरून घरी परत येताना अचानक बिबट रोडवर बघताच बाईकचा नियंत्रण सुटला आणि ही घटना घडली असून जख्मी अविनाशला तातडीने जवळील बल्लारपूर रुग्णालयात दाखल करण्यात आले. शरीरावर गंभीर जख्मा असल्यामुळे त्यांना सामान्य रुग्णालयात रेफर करण्यात आले उपचार दरम्यान त्याचा मृत्यु झाला.
बल्लारपूर महामार्गावर रात्रीच्या सुमारास वाघ, बिबट फिरतांना बऱ्याच लोकांनी बघितलेले आहे. पण आता भर दिवसा बिबट आपला शिकारच्या शोधात फिरताना दिसून येत आहे. या परिसरात नेहमी वाघ बिबटचा वावर असतो तेव्हा वनविभागाने यांचा बंदोबस्तसाठी काही ठोस कारवाही करावी असे ग्रामस्थांची मागणी आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here