ताडोबात सफारी जिप्सी वाहनाच्या रचनेत बदल करण्याचा प्रस्ताव

0
793

ताडोबाला भेट देणाऱ्या पर्यटकांच्या संपूर्ण सुरक्षिततेसाठी वन्यजीव सफारी अधिक सुरक्षित करण्यासाठी ताडोबा व्यवस्थापन मारुती जिप्सी वाहनावर डिझाइनर, फॅब्रिकेटर्स, अभियंता आणि गॅरेज यांच्या कडून पर्यटकाची सुरक्षा आणि संलग्नीकरणाचे डिझाइन आमंत्रित केले आहे.
राज्यात प्रथमच व्याघ्र प्रकल्पाने जंगल सफारी दरम्यान पर्यटकांच्या सुरक्षेसाठी आणखी एक पाऊल पुढे टाकले आहे.
ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प (कोर) उपसंचालक नंदकिशोर काळे म्हणाले की सर्वोत्कृष्ट डिझाईनसाठी 25000 रुपयांचे पारितोषिक दिले जाईल आणि सर्व पर्यटक जिप्सी आणि इतर वाहनांवर बसविण्यास ताडोबा व्यवस्थापना कडून मान्यता दिली जाईल.
यावर वन समाचार प्रतिनिधी ताडोबात येणारे पर्यटकानाशी संवाद केल्यास ते म्हणाले आम्ही जगभर वाइल्ड लाइफ सफारी करतो अशी कोणती ही घटना ऐकलेली नाही जिथे एखाद्या प्राण्याने सफारी वाहनावर हल्ला केला असेल. आम्हाला वाटते अनावश्यक पैसा खर्च करने आहे. त्याऐवजी त्यांनी पेट्रोलिंग कर्मचार्यांना विभागीय ग्राउंड स्टाफला चांगल्या सुविधा देण्यात यावे. अशा निर्णयाने ताडोबा पर्यटनावर परिणाम होण्याची शक्यता आहे.भविष्यात ताडोबा येणारे पर्यटकाची संख्या कमी होणार तेव्हा ताडोबा प्रशासनाने यावर विचार करावे अशी ग्रामस्थ व पर्यटकांमध्ये चर्चा शुरू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here