ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पा अंतर्गत येत असलेला जूनोना गावात बिबट्याचा धुमाकूळ

0
417

ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पा अंतर्गत येत असलेला बफ़र क्षेत्रातील जूनोना गावात दि. 1 दिसंबर 2021 रोजी राञी 9.00 वाजताच्या सुमारास प्रकाश मेश्राम यांच्या घरात बिबटयाने शिरकाव केला असता जुनोना गावातील लोकानी त्याला हाकलून काढले. त्यानंतर पुन्हा परत दुसर्‍या दिवशी दि. 3 दिसंबर 2021 रोजी राञी 2.30 वाजताच्या सुमारास विजय मधुकर मेश्राम यांच्या घरात बिबटयाने शिरकाव केला असता गावातील लोकानी हाकलून काढले. सध्या जुनोना गावात सतत 2 दिवसांपासून बिबट्याचा धुमाकुल शुरू असल्याने ग्रामस्था मध्ये भिंतीचे वातावरण आहे. या पूर्वी देखील बिबट्याने गावातील कोंबड्यांना नेले होते व पाळीव कुत्र्यांना जखमी केले होते.
जूनोना हे गाव जंगलात असल्यामुळे गावा जवळ वन्यप्राण्याचा वावर सतत असतो. गावातील कुत्रे, कोंबडी व शेळीचा शिकार करण्यासाठी बिबट गावात शिरतो. बिबट्याचा जूनोना व देवाड़ा गावात कोंबड्यांचा शिकार करने शुरुच आहे.
अशा वेळेस ग्रामस्थांनी रात्रीच्या वेळेस घरा बाहेर निघू नये, शेळी, कोबड्या व जनावरे बंदिस्त कोठयात ठेवावे. घरा जवळील परिसर स्वच्छ ठेवावे. त्यामुळे कोणाच्याही जीवाला धोका पोहोचणार नाही याची काळजी घेणे गरजेचे आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here