कृषी पर्यटन शेती उद्योगास पूरक

0
426

चंद्रपूर : प्रशांत सवाई उपसंचालक पर्यटन प्रादेशिक कार्यालय नागपूर मौजा जनकापुर चिंधी चक फाटा तालुका नागभीड जिल्हा चंद्रपूर येथे गोविंद बाग कृषी पर्यटन केंद्राचे उद्घाटन दिनांक २७ फेब्रुवारी २०२२ रोजी संपन्न झाले.


सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मान. भाऊसाहेब बऱ्हाटे जिल्हा अधीक्षक कृषी विभाग चंद्रपूर हे होते तर प्रमुख पाहुणे मान. रोशनची डागा संचालक रानवारा पर्यटन स्थळ हिंगणघाट, मान. विलासजी नखाते संचालक शिवतीर्थ पर्यटन स्थळ उंबरी सावनेर, मान. संदीप जी भांगरे नायब तहसीलदार नागभीड, मान. हिरालाल पेंटर नाट्यतथा सिनेकलावंत ब्रह्मपुरी, मान. हरीशजी देशमुख महासचिव अभा.अनिस, माननीय दादाची फुंडे सामाजिक कार्यकर्ते अर्जुनी (मोर) इत्यादी पाहुणेमंडळी सदर प्रसंगी उपस्थित होते. सदर कार्यक्रमाला मान. देवरावजी भांडेकर माजी आमदार, प्राचार्य डॉ. एन एस कोकोडे, प्राचार्य डॉ. अमिर धमानी, प्राचार्य डॉ. सदानंद बोरकर, मान. गहीनाथ जाधववार कृषी अधिकारी ब्रह्मपुरी, प्रा. डॉ. मोहन वाडेकर, मान. सुरेशजी झुरमुरे, डॉ. खिजेंद्र गेडाम, डॉ. थोरात, डॉ. सतिश दोनाडकर, ॲड. देविदास करकाडे इत्यादी प्रमुख मान्यवर मंडळी उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक अँड. गोविंद भेंडारकर यांनी केले आपल्या प्रास्ताविकातून त्यांनी गोविंद बाग हे ठिकाण मध्यवर्ती असून यापासून घोडाझरी, गायमुख, नागभीड येथील शिव टेकडी, सातबहिणीचा डोंगर, मुक्ताई, ताडोबाचे गेट हे सर्व पर्यटन स्थळे अगदी 10 ते 15 की. मी अंतरावरती आहेत. सभोवताल असल्यामुळे गोविंद बाग पर्यटन स्थळ मध्यवर्ती असून चंद्रपूर नागपूर रोडवरती आहे. योग्य अशा ठिकाणी आहे असे आपल्या प्रास्ताविकात त्यांनी प्रतिपादन केले.
चंद्रपूर जिल्ह्यामध्ये कृषी पर्यटनाला भरपूर संधी आहे. यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारून मोठ्या प्रमाणात बेरोजगारांना रोजगार मिळेल. याकरिता शेतकऱ्यांना पुढे येण्याची आवश्यकता आहे व त्यासाठी शासन आपल्या अनेक योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना प्रोत्साहित करीत आहे सोबतच पर्यटन विभाग सहकार्य करण्यास सदैव तयार आहे असे मत उद्घाटन प्रसंगी मान. सवाई साहेबांनी व्यक्त केले.


सदर प्रसंगी मान. रोशनजी डागा आणि मान. विलास नखाते हे स्वतः कृषि पर्यटन स्थळाचे संचालक असल्यामुळे त्यांनी कृषी पर्यटनाचे स्वतःचे अनुभव कथन करून शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. कृषी पर्यटनामुळे शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारेल तसेच उत्पादन घेत असताना शेतकऱ्यांच्या कष्टाची जाणीव पर्यटकांना या माध्यमातून होईल. असे मत आपल्या अध्यक्षीय भाषणात बऱ्हाटे साहेबांनी व्यक्त केले.
सदर कार्यक्रमाचे सुत्र संचालन प्रा. तेजस गायधने यांनी केले तर आभार गोविंद बाग पर्यटन स्थळाच्या संचालिका सौ. आरती भेंडारकर यांनी केले. सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अँड. गौरव भेंडारकर, ॲड. कीर्ति करकाडे, प्रगती महाजन, सौ. स्नेहा कोरे (भेंडारकर), अरविंद नागोसे तुळशीदास राखडे यांनी अथक परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here