पहार्णी परिसरात दहशत निर्माण करणारा वाघ पकडण्यात यश

0
414

यश कायरकर,तळोधी (बा.) :
ब्रम्हपुरी वनविभागातील उत्तर ब्रम्हपुरी व नागभिड वनपरिक्षेत्रातील शेतशिवार परिसरात धुमाकुळ घालत असलेल्या P-2 वाघास (नर) या वाघास दुपारी 2.12 वाजता डार्ट केला व सदर वाघ बेशुध्द झाल्यानंतर त्यास दुपारी 2.38 वाजता पिंज-यात सुरक्षितरित्या बंदिस्त केले.
विशेष म्हणजे, नागभीड वनपरिक्षेत्र अंतर्गत येणाऱ्या पहार्नी बिटातील गावापासून 2 किमी अंतरावर असलेल्या जंगलालगतच्या शेतात काम करायला गेलेली मृतक सुमित्रा वासुदेव कुंबरे वय (50) शेतात गवत कापत असणाऱ्या सदर महिलेवर याच वाघाच्या बड्यांनी हल्ला करून महिलेला ठार केले होते. तर नागभीड वनपरिक्षेत्रातील हुमा (खडकी) चे वनरक्षक बुरले यांच्या आईला सुद्धा या वाघाच्या बछड्यानी तोरगाव मधील त्यांच्या शेतात जखमी केल्याची घटना काही दिवसापूर्वी घडलेली होती. प्रत्यक्षदर्शीनुसार महिलेला हल्ला करून ठार मारणाऱ्या मध्ये तेच वाघाचे दोन बछडे असल्याची चर्चा आहे. तरी यामुळे परिसरात सध्या शेतीचा हंगाम सुरु असल्यामुळे व धान कापणी याकरिता शेतकऱ्यांना शेताचे काम करायला जंगलात असलेल्या शेतामध्ये जावे लागते त्यामुळे लोकांमध्ये सध्या भीतीचे वातावरण पसरलेले होते. तरी वनविभागाने या वाघांचा बंदोबस्त करावा असे परिसरातील लोकांनी मागणी केलेली होती.
ब्रम्हपुरी वनविभागातील उत्तर ब्रम्हपुरी व नागभिड वनपरिक्षेत्रातील शेतशिवार परिसरात धुमाकुळ घालत असलेल्या P-2 वाघास (नर) जेरबंद करण्याचे मा. मुख्य वन्यजीव रक्षक तथा प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) म. रा. नागपूर यांचे आदेश मिळताच.
त्याअनुषंगाने आज दिनांक 03/12/2022 रोजी नागभिड वनपरिक्षेत्रांतर्गत मिंडाळा उपक्षेत्रातील म्हसली नियतक्षेत्रामध्ये (कक्ष क्र. 52 ) डॉ. रविकांत खोब्रागडे, पशुवैद्यकिय अधिकारी (वन्यजीव), RRT ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प, चंद्रपूर यांनी व अजय मराठे, सशस्त्र पोलीस यांनी P-2 (नर) वाघास अचुक निशाना साधून दुपारी 2.12 वाजता डार्ट केला व सदर वाघ बेशुध्द झाल्यानंतर त्यास दुपारी 2.38 वाजता पिंज-यात सुरक्षितरित्या बंदिस्त केले.
सदरची कार्यवाही के. आर. धोंडणे, सहायक वनसंरक्षक (तेंदू) ब्रम्हपुरी,  एस. बी. हजारे, वनक्षेत्रपाल (प्रा) नागभिड, वनविभागाचे क्षेत्रिय अधिकारी / कर्मचारी, तसेच RRT ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प, चंद्रपूरचे सदस्य बी. आर. दांडेकर,  ए. एन. मोहुर्ले,  एस. पी. नन्नावरे,  ए. डी. तिखट,  ए. डी. कोरपे,  ए. एम. दांडेकर व  राकेश अहुजा (फिल्ड बायोलॉजिस्ट, ब्रम्हपुरी) यांचे उपस्थितीत पार पडली.


जेरबंद करण्यात आलेल्या P-2 वाघाचे (नर) वय अंदाजे दोन ते अडीच वर्षे असून त्याला पुढील तपासणीकरिता ट्रांझिट ट्रिटमेंट सेंटर, चंद्रपूर येथे स्थलांतरीत करण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here