ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात क्रुझर वाहनला हिरवी झंडी दाखवून सुरुवात, पर्यटकांसाठी नवा अनुभव

0
1124

चंद्रपूर (मोहम्मद सुलेमान बेग) ; ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील कोअर क्षेत्रात जिप्सी आणि कॅन्टर वाहनांच्या सहाय्याने पर्यटक जंगल सफारीचं आनंद घेत आहेत. जंगल सफारी दरम्यान कोअर क्षेत्रातील विविध पर्यटन मार्गां मध्ये एकेरी आणि छोटे रस्ते असल्यामुळे अनेकदा रास्ता क्रॉस करतांना अडचणे उत्पन्न होत असल्याचे निर्देशनास आले व  कारण कॅन्टर वाहनांचे आवाज इतर पर्यटकांसाठी त्रासदायक होते.


बरेचदा  कॅन्टर वाहन जिप्सीच्या समोर  आल्याने इतर जिप्सीतील पर्यटकांना उच्च दर्जाचा पर्यटनाच्या अनुभवा पासून वंचीत राहावं लागतं होत.या सर्व बाबी लक्षात घेता जिप्सी सारखे दर्जेदार पर्यटनाचं अनुभव देण्याकरिता कॅन्टर वाहनांना ऐवजी 9 सीटें असलेल्या 5 क्रुझर पर्यटन वाहन सुरु करण्याचं निर्णय मान.सुधीर मुनगंटीवार मंत्री वने, सांस्कृतिक कार्य आणि मत्स्य व्यवसाय महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री चंद्रपूर जिल्हा यांनी मांडली असून ताडोबाचे क्षेत्र संचालक डॉ. जितेंद्र रामगावकर व उपसंचालक नंदकिशोर काळे यांच्या संकल्पनेतून  दि. 01 डिसेंबर 2023 रोजी नियोजन भवन चंद्रपूर येथे मान.सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. त्या क्रुझर वाहनची सुरुवात आज दि. 03 डिसेंबर 2023 पासून मोहर्ली गेट वर वनपरिक्षेत्र अधिकारी (कोअर) अरुण गोंड यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून व पर्यटकांना गुलाब फूल देऊन क्रुझर वाहनची सुरुवात करण्यात आली.

सदर क्रुझर वाहनात जंगल सफारीच्या दृष्टीने आवश्यक बदल करण्यात आलेले आहे व तसेच हे वाहन मोहर्ली गेट वरून पर्यटकांसाठी नियमित उपलब्ध राहतील व या वाहनाची बुकिंग व्यवस्था पूर्वी प्रमाणे बुकिंग मशीन द्वारे क्षेत्र संचालक ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प, चंद्रपूर कार्यालयात उपलब्ध राहील.

यावेळेस बोलतांना वनपरिक्षेत्र अधिकारी अरुण गोंड  म्हणाले की “सध्या पूर्वी झालेल्या ऑनलाइन कॅन्टर वाहनच्या बुकिंगच्या पर्यटकांना क्रुझर वाहनात देण्यात आलेले आहेत. यानंतर लवकरच संकेत स्थळावर कॅन्टर वाहन ऐवजी क्रुझर वाहनाचे बुकिंग सुरू करण्यात येणार आहे. क्रुझर वाहन मध्ये 9 सीट पर्यटकांसाठी उपलब्ध असून व ज्या कॅण्टर बस ने आपण काही रस्ते फिरू शकत नव्हतो आता क्रुझर वाहनने जिप्सी सफारी करिता सुरू असलेले सर्व रस्ते  सुरू केलेले आहे”.

वन समाचार चे प्रतिनिधी क्रुझर सफारी करणारे चंद्रपूरचे पर्यटक गौरव होकम (ABVB) सोबत बोलताना ते म्हणाले की “आम्ही कॅन्टर बसची 22 सीटची बुकिंग केलेली होती इथे आल्यावर माहित झाले की कॅन्टर बस बंद करून क्रुझर वाहन सुरू करण्यात आले आहे. पूर्वी कॅन्टर मध्ये 22 सीटची बुकिंग झाल्यावर आत सोडत होते आणि ते काही विशिष्ट रोडने फिरत होती पण आता क्रुझर वाहन  हे 9 सीट ची आहे आणि सफारीचे सर्व रोड फिरविणार आहे. ताडोबा प्रशाशन ने हे चांगले उपक्रम राबविले आहे आणि हे  भविष्यात सगळ्यांना फायदेशीर राहणार आहे.” असे ते म्हणाले.

यावेळेस ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प मोहर्ली कोअर वनपरिक्षेत्र अधिकारी अरुण गोंड, क्षेत्र सहाय्यक व्ही. सोयाम, वनरक्षक एस.मरस्कोले, प्रवेश द्वार व्यवस्थापक आरिफखांँ पठाण, वनमजूर, जिप्सी चालक एवं गाईड उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here