बिबट्याच्या कातडीसह 7 आरोपी वन विभागाच्या ताब्यात

0
825

शहापूर तालुक्यात ग्राहकांच्या शोधात असलेल्या बिबट्याची कातडी विकणारी टोळी वनविभागाच्या ताब्यात. मिळालेल्या गुप्त माहितीनुसार खर्डी च्या वन अधिकाऱ्यांनी सापळा रचून बनावट ग्राहक तयार करून 7 आरोपींना दिनांक 2 फरवरी 2022 रोजी सायंकाळी 5 वाजताच्या सुमारास ताब्यात घेतले.
सदर घटना घोटी जवळील सिन्नर फाट्या जवळील आहे.
तपास दरम्यान बिबट्याचे कातडे व 4 मोटर सायकल जप्त करण्यात आले. तसेच या प्रकरणात आणखी आरोपी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
सदर प्रकरणात खर्डी वन विभागाच्या अधिकाऱ्यांना वाशाळा गाव परिसरात वन्यप्राण्यांच्या कातडीचा व्यापार होत असल्याची गुप्त माहिती मिळताच सतत 15 दिवसापासून नकली ग्राहक बनून टोळी सोबत व्हाट्सअप द्वारे चर्चा सुरू होती.
याप्रकरणात शहापूर चे वसंत धुले यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक वनसंरक्षक अमोल जाधव, खर्डीचे वन अधिकारी प्रशांत देशमुख, विशाल गावंडे, प्रकाश चौधरी व त्यांची चमूने संयुक्त सापळा रचून आरोपीला पकडण्यात यश प्राप्त केले

सदर प्रकरणात काळू सोमा भगत, रघुनाथ शंकर सातपुते, मुकुंद सोमा सराई, अशोक सोमा गेंगाळ, योगेश लक्ष्मण अंदाडे ,गोटीराम गवारी व अर्जुन गोमा पानेडा यांना अटक करण्यात आली असून आरोपी वर वन्यजीव अधिनियम 1972 चे 09, 44, 48 (अ) अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. तसेच पुढील तपास कसून सुरू आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here