ब्रहमपुरी वनविभाग हद्दीत वाघाचा मृतदेह आढळला; वृद्धापकाळामुळे मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज

0
243

चंद्रपूर :
सिंदेवाही वनपरिक्षेत्रातील नवरगाव उपक्षेत्रातील रत्नापूर बीट (कक्ष क्र. 45/609) येथे सरांडी गावाजवळील शेतशिवारात एक वाघ मृतावस्थेत आढळून आला आहे. स्थानिक नागरिकांकडून ही माहिती मिळताच वनपरिक्षेत्राधिकारी अंजली बोरावार मॅडम आणि वनविभागाचे कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले.
तेथे पोहोचल्यावर वाघ बसलेल्या अवस्थेत दिसून आला, परंतु काही क्षणातच त्याने श्वास घेतला नाही हे निदर्शनास आले. लगेचच मोका पंचनामा करण्यात आला. नोंदीनुसार सदर वाघ T-128 असल्याचे ओळख पटले असून, वय अंदाजे 14 वर्षे असल्याचे आढळले. वाघाचा मृत्यू वृद्धापकाळामुळे झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष वनविभागाने दिला आहे.
पुढील तपासणीसाठी मृत वाघाचे शवविच्छेदनासाठी चंद्रपूर येथील टायगर ट्रीटमेंट सेंटर (TTC) येथे पाठवण्यात आले आहे.
संपूर्ण कारवाई ब्रहमपुरी वनविभागाचे उपवनसंरक्षक राकेश शेपट यांच्या मार्गदर्शनात, सहाय्यक वनसंरक्षक महेश गायकवाड (तेंदू) व वनपरिक्षेत्राधिकारी अंजली बोरावार मॅडम यांच्या नेतृत्वात पार पडली.


सदर घटनास्थळी यश कायरकर (अध्यक्ष, SWAB संस्था), क्षेत्र सहाय्यक गडपायले (सिंदेवाही), क्षेत्र सहाय्यक एस. ए. उसेंडी वनरक्षक ओ. व्ही. चहांदे, SWAB संस्थेचे सदस्य, इतर वनरक्षक व वन कर्मचारी उपस्थित होते.
सदर घटनेचे शवविच्छेदन अहवालानंतर मृत्यूचे अचूक कारण स्पष्ट होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here