नागपंचमी निमित्त भारत विद्यालय पळसगाव (जाट) येथे सापाबद्दल माहिती व मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन   

0
686

सिंदेवाही ;      
नागपंचमीच्या निमित्ताने  सापाबद्दल माहिती व मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन भारत विद्यालय पळसगाव जाट येथे आयोजित करण्यात आले.
सदर कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक म्हणून ‘स्वाब’ संस्थेचे अध्यक्ष यश कायरकर यांनी सापाबद्दलची सविस्तर माहिती आणि मार्गदर्शन केले.  कायरकर यांनी सापाबद्दल माहिती देताना “सध्याच्या स्थितीत सापांची संख्या मोठ्या प्रमाणात कमी होत असून हे पर्यावरण व शेतकऱ्यांसाठी चिंतेची बाब आहे. सापांचे संरक्षण करणे म्हणजेच पर्यावरणाची व शेतकऱ्यांची मदत करणे ही काळाची गरज आहे.” असे त्यांनी आपल्या मार्गदर्शनात विध्यार्थ्यांना सांगितले.


तसेच त्यांनी सापाची उत्पत्ती, सापाचे विषावरून होणारे वर्गीकरण, विषारी, निमविषारी, बिनविषारी सापांच्या प्रजातीच्या आपल्या देशातील व चंद्रपूर जिल्ह्यात आढळणाऱ्या प्रमुख सापांच्या बद्दल माहिती देऊन, विषारी साप समजून सापांची ओळख नसल्यामुळे बिनविषारी सापच मोठ्या प्रमाणात मारले जातात असेही त्यांनी सांगितले. सापाबद्दलच्या समाजात असलेल्या अंधश्रद्धा व त्या अंधश्रद्धा कितपत खोट्या आहेत याबद्दल माहिती दिली. त्यासोबत मंत्राने विष उतरत नाही तर त्याकरिता त्याच सापापासून बनलेल्या विषप्रतीरोधक  इंजेक्शन घेणे हेच त्या सापाच्या विषापासून वाचण्याचे एकमेव एक उपाय आहे.
त्यामुळे कोणत्याही बुवा बाबांच्या /मांत्रिकांच्या  किंवा नागमोत्यांच्या आधीन जाऊन आपले जीव धोक्यात घालू नका.” असेही सांगितले .

अंधश्रद्धेत आपले जीव गमवू नये हे सांगताना , सोबतच जादूटोणा विरोधी कायदा 2013, कलम 2 (ख) पोट कलम 9 नुसार ,  साप, कुत्रा, विंचू चावल्यास दवाखान्यात न नेता मंत्रोपचार करत राहणे व त्यात पीडित व्यक्तीचा मृत्यू  झाल्यास शिक्षा म्हणून कमीत कमी सहा महिने ते जास्तीत जास्त पाच वर्षाचा कारावास व दंड म्हणून कमीत कमी पाच हजार रुपये ते जास्तीत जास्त पन्नास हजार रुपयाचा दंड असून. या कायद्यामध्ये गुन्हेगार म्हणून फक्त मांत्रिकच   नाही तर सर्प दंश व्यक्तीला दवाखान्यात न नेता मांत्रिकाकडे  घेऊन जाणारा,  सोबतच ज्या वाहनाने मांत्रिकाकडे नेले ते गाडी ड्रायव्हर, गाडी मालक आणि गाडीमध्ये उपस्थित असणारे लोक, हे सारेच या कारवाईस पात्र ठरतात. व या कायद्याच्या कक्षेत येत असतात असे  कायद्याबद्दल सविस्तर सांगितले.
उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना आपल्या देशात अन्नधान्याच्या उत्पादनापैकी 33% धान्य हे उंदीर नष्ट करतात व  त्या उंदरांच्या संख्येवर नियंत्रण ठेवून साप हे शेतकऱ्यांना मदतच करतात  साप शेतकऱ्यांचे मित्र आहेत त्यामुळे यापुढे सापांचे रक्षण करण्याकरिता व पर्यावरणाला मदत करण्याकरता  “साप दिसल्यानंतर तात्काळ सर्पमित्रांना कळवा व सापांचे जीव वाचवा” असे आवाहन केले.
यावेळी स्वाब संस्थेचे सह सचिव हितेश मुंगमोडे, सदस्य व सर्पमित्र जिवेश सयाम, महेश बोरकर, व भारत विद्यालय शाळेचे संपूर्ण  विद्यार्थी, शिक्षक  व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे संचालन कुमार सर यांनी केले तर  बोरकर सर यांनी मार्गदर्शक व इतरांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here