लाखांदूर (भंडारा) : लाखांदूर तालुक्यातील दहेगाव जंगलात सरपण गोळा करण्यास गेलेल्या एका 54 वर्षीय इसमावर वाघाने हल्ला केल्याची घटना घडली असता पुन्हा एक तालुक्यातील वाघाची ही दुसरी घटना घडल्याने तालुक्यात भीतीचे वातावरण पसरलेले आहे.
दि. 5 एप्रिल 2022 रोजी इंदोराच्या जंगलात मोहफुल गोळा करण्यास गेलेल्या एका इसमावर वाघाने हल्ला केल्याची घटना उघडकीस आली. सदर घटनेत मृतकाचे नाव जयपाल घोगलु कुंभरे रा. इंदोरा, वय ४० वर्ष आहे.
प्राप्त माहितीनुसार जयपाल सकाळच्या सुमारास इंदोरा जंगलात मोहफुले गोळा करण्यास गेलेल्या इसमाला ठार केल्याची इंदोरा ते अरुण नगर मार्गावरील घटना दुपारच्या सुमारास उघडकीस आली.
जंगलात मोहफुल गोळा करून एका झाडा खाली रस्त्यावर वरील सायकलवर मोहफुल ठेवून परत जवळच दुसऱ्या झाडा खाली मोहफुल गोळा करण्यास गेले असता जवळच झुडपात असलेला एका वाघाने अचानक त्याच्यावर हल्ला चढविला व वाघाने तब्बल २०० मीटर अंतरावर फरफटत नेत त्याचा उजवा पाय फस्त केला. सकाळी मोहफुल गोळा करण्यास गेलेला इसम दुपारी उशिरा घरी परत न आल्याने परिवारातील सदस्यांनी व ग्रामस्थांनी त्याचा शोध घेतले असता दुपारच्या सुमारास जंगलात मृतदेह आढळून आले.
सदर घटनेची माहिती स्थानिक लाखांदूर वन विभागासह पोलिस प्रशासनाला देण्यात आली. यानंतर पोलिसांसह वनाधिकारी व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळ गाठून पंचनामा करत मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले.
सदर वाघाचा बंदोबस्त करण्याची मागणी ग्रामस्थ करीत आहे.