मोहर्ली वन परिक्षेत्रातील PRT ला ड्रेस कोड वाटप

0
1253

*मोहर्ली वन परिक्षेत्रातील PRT ला ड्रेस कोड वाटप*

चंद्रपुर :

जगप्रसिद्ध ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पांतर्गत येत असलेल्या मोहर्ली वन परिक्षेत्रातील गावांमध्ये वन विभागाने PRT (Primary Response Team) प्राथमिक कृती दल स्थापित केलेली आहेत. एका PRT मध्ये 5 सदस्यचा समावेश आहे असे एकूण 9 PRT मध्ये 45 सदस्य कार्यरत आहे
PRT चे काम बफर जंगल परिसरात गस्त करणे, त्या परिसरातील वन्यप्राणीच्या हालचाली वर लक्ष ठेवणे, आसपास होत असलेला वन गुणा विषयी वन विभागाला माहिती देणे, इत्यादि कामे आहे तसेच PRT सदस्यांना फायर वॉचर करिता प्राधान्य देण्यात येत आहे त्याकरिता त्यांना ५००० रु प्रति महा ताडोबा फाउंडेशन तर्फे देण्यात येत आहे.
दिनांक ०३ मार्च रोजी मोहर्ली वनपरिक्षेत्राच्या गेस्ट हाऊस येथे वन विभागा तर्फे ड्रेस कोड वाटप चा कार्यक्रम  घेण्यात आला. यात २ ड्रेस कोड, १ कॅप, १ जोडी शूज, बेल्ट आणि टॉर्च चा वाटप करण्यात आला.
जंगलतील आग व मानव-वन्यजीव संघर्षाचा कामांमध्ये PRT (Primary Response Team) चा भरपूर मदत वन विभागाला मिळत आहे.
यावेळेस सहाय्यक वनसंरक्षक येेडे, मोहर्ली वनपरिक्षेत्र अधिकारी मून, वनक्षेत्र अधिकारी मल्लेलवार, PRT समन्वयक तुमराम  यांच्या उपस्थितीत ड्रेस कोड वाटप करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here