आपसी लढाईत जख्मी नर चितळाचा उपचारापूर्वीच मृत्यू ; तळोधी बा. वनपरिक्षेत्रातील घटना

0
169

यश कायरकर (जिल्हा प्रतिनिधी) :
ब्रह्मपुरी वनविभाग ब्रम्हपुरी अंतर्गत येत असलेल्या तळोधी बाळापुर वनपरिक्षेत्रातील आलेवाही बिटा मधील हस्तानपूर गावालगत आज दि. ८ फेब्रुवारी २०२४ रोजी सकाळच्या सुमारास एक जखमी नर चितळ एका शेतात मध्ये असल्याचे लोकांच्या निदर्शनास आले. त्यांनी सदर घटनेची माहिती स्वाब संस्थेला दिली व  स्वाब संस्थेने वन विभागाला माहिती देऊन घटनास्थळी पाहणी केली असता त्या जखमी नर चितळाचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला.
यावेळी अरविंद माने क्षेत्र सहाय्यक तळोधी बाळापुर, पंडित मेकेवार वनरक्षक आलेवाही बिट यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. चित्तळाच्या शरीरावरील जखमा व तुटलेला शिंगावरून आपसी लढाईतच हा नर चितळ जख्मी झाले   असल्याने त्याचा मृत्यू झाला असावा असे प्राथमिक अंदाज व्यक्त केले जात आहे.
त्यानंतर घटनास्थळाचा पंचनामा करून तळोधी बाळापुर वनपरिक्षेत्रातील सावरगाव येथील रोपवाटिकेमध्ये  एच.बी.बनाईत पशुवैद्यकीय अधिकारी अ.का. तळोधी बा. यांनी शवविच्छेदन केले व नंतर मृत नर चितळाला अग्नी देण्यात आले.


यावेळी अरूप कन्नमवार वनपरिक्षेत्र अधिकारी तळोधी बा, राजेंद्र भरने वनरक्षक तळोधी, यश कायरकर अध्यक्ष स्वाब संस्था, सदस्य व सर्पमित्र जीवेश सयाम, शुभम निकेशर, नितीन भेंडाळे, गिरीधर निकुरे, हे स्वाब संस्थेचे सदस्य, देवेंद्र ऊईके ,पेंदाम आलेवाही वन चौकीदार व वनमजूर मोठ्या संख्येत उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here