स्थानिक वनरक्षक व वृक्षतोड करून तस्करी करनारांवर कारवाईची विविध संघटनां तर्फे मागणी

0
201

घोडाझरी अभयारण्य व परिसरात जंगल व वन्यजीव धोक्यात, स्थानिक शेकडो लोकांनी, वन्यजीव प्रेमी संस्था याची वरिष्ठांना चौकशी व संबंधित वनरक्षक,व तस्करांवर कारवाई संदर्भात मागनी.

तळोधी (बा )यश कायरकर:

“घोडाझरी अभयारण्य व नागभीड वनपरिक्षेत्रातील शेंकडों बहुमुल्य वृक्षतोड , व चोरी लपविण्यासाठी वन्यजीवांच्या अधिवास असलेल्या परिसरात आग लावून जंगल संपदा संपवन्याचा अघोरी प्रयत्न अत्यंत निंदनीय, वरिष्ठ स्तरावरून करनार चौकशीची मागणी” विवेक भाऊ करंबेकर मानद वन्यजीव रक्षक ब्रम्हपुरी.

मागील काही दिवसात नागभीड वनपरिक्षेत्र अंतर्गत व घोडाझरी अभयारण्य अंतर्गत मोठ्या प्रमाणात वृक्षतोडी व सागवान तस्करी ची भांडाफोड झालेली आहे. नागभीड वन परिक्षेत्र अंतर्गत सागाची मोठी लाकडे जप्त करण्यात आली व नंतर परिसरात होणाऱ्या वृक्षतोडी व तस्करीचा मोठा रॅकेट सक्रिय असून त्यांना स्थानिक वनकर्मचारी यांच्या सहकार्यातून ही तस्करी सुरू असल्याचे चर्चेला ऊत आला.
सविस्तर काही दिवसापूर्वी नागभीड वनपरिक्षेत्र अंतर्गत मांगरुड बिटातील स्थानिक मांगरुड निवासी मधुकर सातपैसे यांच्या शेतातील गट क्रमांक १६३ मध्ये तनसिच्या ढिगार्‍यात लपवून ठेवलेली ७ मोठी सागाची लाकडे जप्ती करण्यात आली. त्यानंतर सलग त्याच परिसरात तील काही शेतात व नाल्यात पुन्हा सागाची लाकडे व पाट्या, आरा असी जप्ती करण्यात आली . यांच गावात वनरक्षक मांगरुड यांचे निवास आहे हे ही महत्त्वाचे.परंतु त्यांना या रोज होनार्या तस्करीची कल्पना नसने हे ही प्रश्नार्थकच?
या मांगरुड बीड परिसरात व लागूनच असलेल्या घोडाझरी अभयारण्यातून मोठ्या प्रमाणात साग व शिसम सारख्या बहुमूल्य वृक्षांची वृक्षतोड व तस्करी व त्यानंतरही वृक्षतोड लपिण्याकरिता या वृक्षांच्या तोडलेल्या बुंध्याला व अभयारण्याला लावलेली आग, या दोन्ही घटनांमध्ये फक्त वृक्ष तस्करच नाही तर स्थानिक वनकर्मी यांचेही मोलाचे योगदान असल्याच्या चर्चेला उधाण आले आहे . व त्या संदर्भात सखोल चौकशी करून संबंधित वन अधिकार्‍यांवर निलंबनाची कारवाई करण्यात यावी. याकरिता स्थानिक शेकडो लोकांनी उपवनसंरक्षक ब्रह्मपुरी वनविभाग ब्रह्मपुरी यांना निवेदन सादर केले आहे.
यासंदर्भात घोडाझरी अभयारण्य परिसरातील वन्यजीव सेवी संस्था ‘तरुण पर्यावरणवादी मंडळ शंकरपुर’ संस्थेचे अध्यक्ष अमोद गौरकर यांनी ” ही वृक्षतोड व तिला लपविण्याकरता आग लावून एवढा मोठा अभयारण्य जाळणे हे फार निंदनीय आहे . तरी या संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे चौकशीची मागणी करून संबंधितांवर कठोर कारवाई करावी” असे निवेदन दिल्याचे सांगितले.
याच संदर्भात स्थानिक मांगरुड चे सरपंच वैभव निकुरे यांनी सांगितले की “ही फक्त या परिसरातील सागवन तस्करीची बाब नसून शिसम सारख्या बहुमूल्य वृक्षांची मोठ्या प्रमाणात कत्तल करून तस्करी ही या परिसरात खूप दिवसापासून सुरू आहे. तसेच या बीटातिलच नाहीतर घोडाझरी अभयारण्य परिसरातील, डोंगर परिसरातील मांगरूळ तलाव पाळी वरील , खरबी च्या तलाव परिसरातील अशी आजूबाजूच्या परिसरातील शेकडो सागवान ची मोठ्या प्रमाणात कत्तल होऊन रोजच तस्करी केली जात आहे‌ व त्यानंतर ही तस्करी ची घटना लपविणे करिता शिल्लक राहिलेल्या झाडांच्या बुंध्याला जाळून पुरावे नष्ट करण्याकरता अभयारण्य व जंगलाला जाळून परिसराची खूप मोठी नुकसान करण्यात आलेली आहे. फक्त वृक्ष तोडच नाही तर मांगरुड बिटातीलव वन्यप्राण्यांच्या द्वारे शेत पीक नुकसानीचे लाखो रुपयाचे खोट्या केसेसी द्वारे फार मोठा भ्रष्टाचार या बिटात करण्यात आलेला असुन, या बद्दल सविस्तर चौकशी करून संबंधित वनरक्षकांवर निलंबनाची कारवाई करावी” असे आरोप करत यासंदर्भात निवेदन उपवनसंरक्षक अधिकारी ब्रह्मपुरी यांना देण्यात आल्याचे सांगितले.
या संपूर्ण तस्करी संबंधात स्थानिक वन्यजीव प्रेमी व पत्रकारांना द्वारे माहिती मिळाल्यानंतर मानद वन्यजीव संरक्षक श्री विवेक भाऊ करंबेकर ब्रह्मपुरी यांनी परिसराची चौकशी करून यासंदर्भात “घोडाझरी अभयारण्य व नागभीड वनपरिक्षेत्रातील शेंकडों बहुमुल्य वृक्षतोड , व चोरी लपविण्यासाठी परिसरात आग लावून जंगल संपवन्याचा प्रयत्न अत्यंत निंदनीय, वरिष्ठ स्तरावरून चौकशीची मागणी करनार असल्याचे” ते म्हणाले.
“संपूर्ण वृक्षतोड व इतर निवेदन संदर्भात योग्य चौकशी करून संबंधित व्यक्तींवर योग्य कारवाई करण्यात येईल” असे श्री दिपेश मल्होत्रा उपवनसंरक्षक ब्रह्मपुरी वन विभाग यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here