भामडेळी येथे वीज सनियंत्रण उपकरण

0
184

ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प अंतर्गत येत असलेल्या भामडेळी मध्ये वीज सनियंत्रण उपकरण लावण्यात आले. एकीकडे देशात कोरोना ची महामारी सुरू आहेत त्यासाठी सतत लढा शुरू आहे तर येत्या पावसाळ्यात वीज पडून जीवित हानी होऊ नये म्हणून गट ग्रामपंचायत भामडेळी व बांधकाम विभागाच्या संयुक्त विद्यमाने भामडेळी येथे ग्रामपंचायतच्या आवारात वीज सनियंत्रण उपकरण लावण्यात आले.
जंगल परिसरातील शेतात वीज पडूंन मृत्यु झाल्याची घटना आपण नेहमीच बघतो. या सनियंत्रण उपकरण द्वारे दीड ते दोन कि.मी. अंतरावर पडणारी वीज शोषूण घेण्याची क्षमता आहे ज्यामुळे त्या परिसरात होणारी जीवित हानी टाळता येईल.
यावेळी सरपंच सुषमा जिवतोडे, उप सरपंच शामल नन्नावरे, ग्रामपंचायत कर्मचारी विनोद घरत, कम्प्युटर ऑपरेटर ईश्वर घोडमारे व ग्रामपंचायत चे सर्व सदस्य आदि उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here