बिबट्याच्या अवयवसह एक आरोपी ताब्यात : नागपूर व भंडारा वनविभागाच्या संयुक्त  कार्यवाहीला मिळाले यश

0
917

नागपूर :
नागपूर वनविभागाच्या पथकास , भंडारा वनविभागातील पवनी वनपरिक्षेत्र अंतर्गत मौजा सावर्ला जि. भंडारा येथे बिबट्याच्या अवयवांची तस्करी होत असल्याची गुप्त माहितीच्या आधारे नागपूर वन विभागा अंतर्गत विशेष पथक तयार करून भंडारा वन विभागाच्या पथकासह सापळा रचून मौजा तोरगाव येथे बिबट्याच्या अवयवांची तस्करी करणाऱ्या आरोपीला ताब्यात घेण्यात आले.


सदर प्रकरणात आरोपी रंगनाथ शंकर माथेरे वय 35 वर्ष रा. तोरगाव पो. मोर्शी ता. ब्रह्मपुरी जि. चंद्रपूर असे असून तपास दरम्यान बिबट्याच्या मिशा 21 नग, नखे 13 नग व दात 12 नग मुद्देमाल जप्त करण्यात आले.
सदर प्रकरणात आरोपी विरुद्ध (संरक्षण व वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972 च्या विविध कलमा अंतर्गत वन गुन्हा आज दिनांक 9 फरवरी 2022 रोजी अन्वये नोंदविण्यात आला सदर कारवाही सुरेंद्र वाढई सो. मुख्य वनसंरक्षक (प्रा) नागपूर वनवृत्त नागपूर, डॉ. भरतसिंग हांडा उप वनसंरक्षक (प्रा) नागपूर वन विभाग, कुलराज सिंह उप-वनसंरक्षक (प्रा) भंडारा वनविभाग यांचे मार्गदर्शनात एन.जी. चांदेवार सहाय्यक वनसंरक्षक यांनी दिलेल्या गुप्त माहितीनुसार यशवंत नागुलवार सहाय्यक वनसंरक्षक, साकेत शेंडे सहाय्यक वनसंरक्षक, लहू ठोकळ कृष्ण वनपरिक्षेत्र अधिकारी बुटीबोरी, कुमारी कोमल जाधव वनपरिक्षेत्र अधिकारी (प्रा) पवनी, निलेश तवले, सुधीर कुलरकर, विनोद शेंडे, गणेश जाधव, दिनेश पडवळ तसेच भंडारा वनविभाग वनपरिक्षेत्र पवनीचे क्षेत्रीय कर्मचारी यांनी यशस्वी कार्यवाही केली आहे.
सदर वन गुन्हाच्या अनुषंगाने यशवंत  नानूलवार सहाय्यक वनसंरक्षक भंडारा वनविभाग हे पुढील तपास करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here