चंद्रपुरातील दुर्गापूर परिसरात हल्ला करणाऱ्या बिबट्याला गोळ्या घालून ठार मारण्याचे आदेश

0
760

चंद्रपुर : चंद्रपूर शहरातील दुर्गापूर परिसरात मागील काही महिन्यापासून बिबट्याची दहशत सतत सुरू आहे. दिनांक 10 मे 2022 मंगळवार रोजी रात्री 9 वाजताच्या सुमारास 3 वर्षीय चिमुकल्या मुलीला उचलून नेल्याचा प्रयत्न केला असता आपल्या चिमुकल्या मुलीला वाचविण्यासाठी तिच्या आईने बिबट्या सोबत झुंज केले व आपल्या मुलीला बिबट्याच्या तावडीतुन तिला वाचविले.

सदर घटनेत जखमी असलेल्या मुलीचे नाव आरक्षा जगजीवन पोप्पलवार असून ती दुर्गापूर वार्ड क्र. 1 मध्ये अंगणात खेळत असताना अचानक बिबट्याने तिचावर हल्ला केला बिबट्याच्या तावडीतून मुलीला वाचविण्यासाठी आईने काठी घेऊन समोर आली आरडा ओरड झाल्याने परिसरातील नागरिकांनी गर्दी जमा झाली. आरडा ओरड होताच बिबट्याने चिमुकल्या मुलीला  सोडून पळून गेला त्या दरम्यान तिच्या शरीरावर किरकोळ जखमा झाल्या असून उपचारासाठी चंद्रपूर जिल्हा सामान्य रुग्णालय भरती करण्यात आले आहे.

सदर घटने नंतर संतापलेल्या नागरिकांनी घटनास्थळी आलेले वनपरिक्षेत्राधिकारी यांचेसह 10 वन कर्मचाऱ्यांना घेराव घालून बंदीवासात टाकले.
तेथील नागरिकांची एकच मागणी होती की, दुर्गापूर परिसरात हल्ला करणारा बिबट व वाघाला जिवंत ठार करण्याचे आदेश शासनाकडून आणावे तेव्हाच दाबून ठेवलेल्या वन विभागाच्या अधिकारी तथा कर्मचाऱ्यांची सुटका करण्यात येईल.
वाघ व बिबट्याला ठार करण्याचे आदेश आल्यावर 5 तासांनी वनअधिकारी यांची सुटका करण्यात आली.   यावेळी भारतीय जनता पार्टी चे शहर उपाध्यक्ष  तथा मनपा नगरसेवक  माननीय रामपाल सिंग तथा माजी सरपंच व ग्रामपंचायत सदस्य  श्रीनिवास जंगम  तथा सुनील बरीयेकर  ग्रामपंचायत सदस्य हे प्रामुख्याने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here