Google search engine
Home Breaking News दुर्गापुर परिसरात धुमाकूळ घालणाऱ्या बिबट्याला जेरबंद करण्यात वन विभागाला मिळाले यश

दुर्गापुर परिसरात धुमाकूळ घालणाऱ्या बिबट्याला जेरबंद करण्यात वन विभागाला मिळाले यश

0
680

चंद्रपूर  :- चंद्रपूर शहरातील दुर्गापूर परिसरात मागील अनेक महिन्यापासून वाघ व बिबट्या च्या हल्ल्यामुळे  अनेकांचे बळी घेणारा बिबट्याला जेरबंद करण्यास वनविभागाला यश मिळाले.
आज 13 मई 2022 रोजी पहाटे 4 वाजताच्या सुमारास वनविभागा ने लावलेल्या  पिंजऱ्यात बिबट्या अडकला आहे मात्र हा तोच  हल्ला करणारा बिबट आहे की नाही हे यावर सध्या प्रश्नच आहे, कारण यापृवी देखील असाच बिबट पिंजऱ्यात अडकला होता मात्र तो हल्ला करणारा नव्हता असे म्हटले जात आहे. त्यानंतर सुद्धा दुर्गापूर परिसरात सतत हल्ले सुरूच होते.
पण शेवटी आज पहाटेच्या सुमारास मानवी वस्तीत येऊन हल्ला करणारा बिबट दुर्गापूर परिसरात फिरत असल्याचे  वनविभागाच्या गस्त करणाऱ्या टीमच्या लक्षात येताच त्याने त्या बिबट्याला डॉट मारून बेशुद्ध करून जेरबंद केले.


परिसरातील नागरिकांना मध्ये जे भीती निर्माण झाली होती ती कमी झाले असल्याचे दिसून येत आहे.
भविष्यात अशा प्रकारच्या घटना होऊ नये यावर प्रशासनाने यावर विचार करणे गरजेचे आहे असे ही म्हटले जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here