तीन वर्षीय चिमुकल्या मुलीला केले बिबट्याने जखमी

0
326

चंद्रपूर :  चंद्रपूर शहरातील दुर्गापूर परिसरात मागील काही महिन्यापासून बिबट्याची दहशत सतत सुरू आहे। दिनांक 10 मे 2022 मंगळवार रोजी रात्री 9 वाजताच्या सुमारास 3 वर्षीय चिमुकल्या मुलीला उचलून नेल्याचा प्रयत्न केला असता आपल्या चिमुकल्या मुलीला वाचविण्यासाठी तिच्या आईने बिबट्या सोबत झुंज केले व आपल्या मुलीला बिबट्याच्या तावडीतुन तिला वाचविले.

सदर घटनेत जखमी असलेल्या मुलीचे नाव आरक्षा जगजीवन पोप्पलवार असून ती दुर्गापूर वार्ड क्र. 1 मध्ये अंगणात खेळत असताना अचानक बिबट्याने तिचावर हल्ला केला बिबट्याच्या तावडीतून मुलीला वाचविण्यासाठी आईने काठी घेऊन समोर आली आरडा ओरड झाल्याने परिसरातील नागरिकांनी गर्दी जमा झाली. आरडा ओरड होताच बिबट्याने चिमुकल्या मुलीला  सोडून पळून गेला त्या दरम्यान तिच्या शरीरावर किरकोळ जखमा झाल्या असून उपचारासाठी चंद्रपूर जिल्हा सामान्य रुग्णालय भरती करण्यात आले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here