
नागभीड :
घोडाझरी तलाव मागील तीन वर्षाच्या विश्रांती नंतर ओव्हरफ्लो झाला आणि ओव्हरफ्लोच्या पाण्याची आनंद घेण्याकरिता तिथे अनेक पर्यटक भेट देऊ लागले होते. मात्र लगातार होणाऱ्या पावसामुळे पर्यटनात अडचणी निर्माण होऊ लागली आहे.
घोडाझरी ओव्हरफ्लो कडे जाणाऱ्या रस्त्यावरील पुलच वाहून गेले असल्यामुळे पर्यटकसाठी प्रवेश आपोआपच बंद झालेला आहे.
सतत तीन दिवसापासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे नाले पूर्णपणे भरून वाहू लागल्याने आहे. घोडाझरी महामार्गावरील प्रवेश द्वारा जवळ 500 मीटर अंतरावर असलेला व घोडाझरी अभयारण्य परिसरातून जाणारे पर्यटन मार्ग बंद झाला आहे. त्यामुळे वन विभागाने महामार्गावरील लागून असलेल्या गेटवर प्रवेश बंद केले आहे व चिथीचक -किटाळी -खडकी मार्गाने गेट नंबर दोन ने प्रवेश देणे सुरू झालेले आहे.
पाणी सतत वाहत असल्यामुळे या रस्त्यावर पूल सध्या तरी पूर्णत्व करणे शक्य नसल्याने 15 ऑगस्टला सुद्धा येथून पर्यटनासाठी जाण्याची परवानगी निसर्ग देणार असे सांगता येत नाही व हा रस्ता 15 ऑगस्टला सुद्धा पर्यटकांसाठी बंद राहण्याची शक्यता आहे. मात्र येत्या 15 ऑगस्ट ला जर घोडाझरी पर्यटन सुरू ठेवण्यात आले तरी पर्यटकांना गेट नंबर दोन वरूनच प्रवेश देण्यात येण्याची शक्यता आहे.
मागील तीन वर्षांपूर्वी 19 मध्ये झालेल्या घोडाझरी मधील सुरू असलेले पर्यटन हे वनविभाग व पोलीस विभाग यांनी 19 ला 15 ऑगस्टला कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी व कोणतेही अनुचित घटना होऊ नये म्हणून 15 ऑगस्ट ला बंद ठेवण्यात आलेले होते.
मात्र यावर्षी वनविभाग काय निर्णय घेणार याकडे सगड्याचे लक्ष लागले आहे.
वनविभाग कोणतेही निर्णय घेत असेल तरीही निसर्गाने मात्र अभयारण्यातून जाणारा मार्ग 15 ऑगस्ट पर्यंत बंद करून ठेवलेला आहे हे ही तेवढेच सत्य आहे.
