वाघाच्या हमल्यात गुराखी ठार, बैलाला वाचविण्याच्या नादात गमविला जीव

0
136

जिल्हा प्रतिनिधी (यश कायरकर): ब्रह्मपुरी वनविभाग ब्रह्मपुरी मधील चिमूर वनपरिक्षेत्रातील शंकरपूर येथून जवळच असलेल्या डोमा येथील एक गुराख्यास वाघाने हल्ला करून ठार केले आहे ही घटना आज १५ जुलई शनिवार रोज उघडकीस आली.
सविस्तर वृत्त याप्रमाणे आहे की डोमा येथील डोमळू रामाजी सोनवाने वय 65 वर्ष असून हा नेहमी प्रमाणे डोमा बिटातील कंपार्टमेंट नंबर 474 , येथे नेहमी प्रमाणे जनावरे चारासाठी दि. १४ जुलई रोजी जनावरे घेऊन जंगलात गेला होता मात्र सायंकाळी संपूर्ण गुरे घरी येऊन देखील गुराखी गावात परत न आल्यामुळे रात्री काही विपरीत घडल्याच्या उद्देशाने परिसरात सुभाषित करण्यात आली मात्र अंधार पडल्यामुळे काही कळू शकले नाही तसेच वनविभागाला सूचना देण्यात आली त्या अनुषंगाने परत सकाळी परिसराची चौकशी व शोधाशोध केली असता, त्याच परिसरामध्ये एक बैल मेलेल्या अवस्थेत व वाघाने खाल्लेले अवस्थेत आढळून आला.  तर त्याच्याच बाजूला काही अंतरावर डोमळू सोनवणे हा गुराखी सुद्धा मृत अवस्थेत आढळून आला. बैल हा खाल्लेल्या अवस्थेमध्ये होता मात्र मृतकाची पाहणी केली असता त्याच्या मानेवर व डोक्यावर वाघाच्या दातांचे निशान होते मात्र त्यांची संपूर्ण शरीर ही सुरक्षितच होती यावरून असा अंदाज व्यक्त होते की वाघाने हमला केल्यानंतर गोऱ्याला  वाचवण्यासाठी गुराखी गेला असता त्याला ही वाघाने ठार केले असावे. मात्र वाघ हा नरभक्षक नसल्यामुळे त्याने मृतकाला दुसऱ्यांदा स्पर्श सुद्धा केला नाही.


सदर घटनेची माहिती वनविभागाला दिली असता वनपरिक्षेत्र अधिकारी देऊळकर,  वनपाल पोरते,  वनरक्षक विशाल सोनूले,  वन मजूर प्रदीप ढोणे, यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला व शवविच्छेदनांसाठी उप जिल्हा रुग्णालय चिमूर येथे पाठवण्यात आले असून , मृतकाच्या नातेवाईकांना वन विभागा तर्फे तात्काळ 25 हजार रुपयांची मदत करण्यात आली. तसेच घटनास्थळी कॅमेरे लावण्यात आले आहेत. व परिसरात वन्यजीवांचा वावर असल्यामुळे गुराखी व जंगला लगतच्या शेतकऱ्यांनी दक्षता घ्यावी अशा सूचना वनविभागामार्फत देण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here