मुंगूस या वन्यजीव प्राण्यांच्या केसांपासून बनवलेली पेंटींग ब्रश जप्त : कराड मध्ये वनविभागाची धडक कारवाई

0
445

आज दि.15 दिसंबर 2021 रोजी कराड येथे विविध रंग व्यवसायिक यांच्या दुकानावर एकाच वेळी वनविभागाने धाड टाकून मुंगूस या वन्यप्राणी च्या केसांपासून बनवलेले ब्रश मोठ्या प्रमाणावर जप्त करण्यात आले.

मिळालेल्या गुप्त माहिती नुसार आज दि.15 दिसंबर 2021 वनविभाग कराड व वन्यजीव अपराध नियंत्रण ब्युरो यांनी संयुक्तपणे कारवाई राबवत कराड व मलकापूर मध्ये एकाच वेळी जवळपास पाच दुकानावर छापे मारण्यात आले.

सदर रेड मध्ये सर्व दुकानात मुंगूस या वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972 अंतर्गत संरक्षण असलेल्या वन्यप्राणी याच्या केसांपासून बनवलेले ब्रश मोठ्या प्रमाणात सापडले आहे. सदर सर्व ब्रश जप्त करण्यात आले आहे.

शिवानी पेंट्स – राजेंद्र विठ्ठल सुपणेकर ,वय 37 रा.मलकापूर कराड, देवकर पेंट्स – संदीप किसनराव देवकर, वय 45 रा. शनिवार पेठ कराड, सनशाईन पेंट्स, मलकापूर. – तोहीम नजीर शेख वय- 39 रा.वघेरी, भारत पेंट्स, मलकापूर- नविद गुल्महुसेन वाईकर वय 24, सह्याद्री पेंट्स-रा.कराड, अखतर सिराज वाईकर वय 51 वर्ष असून शिवानी पेंट्स – 92 ब्रश, देवकर पेंट्स – 447 ब्रश, सनशाईन पेंट्स – 212 ब्रश, भारत पेंट्स – 163 ब्रश
सह्याद्री पेंट्स – 821 ब्रश असे एकूण – 1735 ब्रश जप्त केले.

मुंगूस वन्यप्राणी याच्या केसांपासून बनवलेले ब्रश जप्त करण्यात आले आहेत. वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972 कलम 39 , 49 ब 50 ,51 नुसार गुन्हा दाखल करण्यात आले आहे.

मुंगूस हा वन्यजीव असून निसर्ग साखळीत हा किडे खाऊन एक महत्वाची भूमिका बाजावत असतो. काही लोग ह्या निरुपद्रवी प्राण्यास मारून त्याच्या कातडी व केसांपासून असे ब्रश बनवले जातात.सदर ब्रश हे रंगारी, आर्टिस्ट हे वापरतात तरी सदर ब्रश बाळगणे , व त्याची विक्री करणे हा कायद्याने गुन्हा आहे. वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972 नुसार सदर मुंगूस प्राणी हा शेड्युल 2 भाग 2 मध्ये येतो.

महादेव मोहिते
उपवनसंरक्षक सातारा

उपवनसंरक्षक महादेव मोहिते यांच्या नेतृत्वाखाली सहायक वनसंरक्षक महेश झांजुर्णे ,परिक्षेत्र वनाधिकारी तुषार नवले, मानद वन्यजीव रक्षक रोहन भाटे तसेच सदर कारवाई मध्ये वन्यजीव अपराध नियंत्रण ब्युरो मुबंई येथून आलेले कोन्स्टेबल विजय नांदेश्वर व संदीप येवले तर वनविभाग कराड येथील वनपाल ए.पी.सावखंडे, डी. डी.जाधव,बि. बी.कदम, तर वनरक्षक रमेश जाधवर, दत्ता जाधव, अरुण सोळंखी, उत्तम पांढरे, अश्विन पाटील, शंकर राठोड, सुभाष गुरव, सविता कुट्टे,दीपाली अवघडे, पूजा परुले, पूजा खंडागळे, शीतल पाटील, संतोष यादव,अरविंद जाधव हे सहभागी होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here