वाघाच्या शिकार प्रकरणात ४ इसम वनविभागाच्या ताब्यात

0
470

सावली तालुक्यातील वनउपक्षेत्र पेंढरी मक्ता कक्ष क्र. १६६७ येथील घटना आज दिनांक १६ डिसेंबर २०२१ रोजी उघडकीस आली.
मिळालेल्या गुप्त माहितीनुसार पाडूरंग मोनाजी गेडाम यांच्या घराची झडती घेतली असता वाघाच्या मिश्या जप्त करण्यात आले. तसेच वन विभागाच्या कसून तपासणी दरम्यान यात हिराचंद मुखरु भोयर राहणार पेंढरी यांच्या शेता मध्ये अंदाजे २ ते ३ महिन्यापूर्वी विद्युत करंट लावून वाघाला ठार मारण्यात सहकार्य करणारे रामदास बाजीराव शेरकी व मारोती पोचू गेडाम रा. पेंढरी यांच्या मदतीने कक्ष क्र. १६६७ (संरक्षित वन) येथे गाडण्याची कबुली दिली.
सदर आरोपीला ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here