झोपलेल्या मेंढपाळावर वाघाचा? बिबट्याचा हल्ला

0
625

यश कायरकर :
तळोधी बाळापुर वनपरिक्षेत्र अंतर्गत आलेवाही बिठातील वाढोणा या गावात. रात्री आपल्या मेंढ्यांच्या कडपा जवळ झोपलेला मेंढपाळ ‘दत्तू बाल्लमवार (35) याच्यावर अचानक बिबट्याने किंवा वाघाने हल्ला करून त्याला गंभीर जखमी केले. हल्ला केल्यानंतर वाघाने, बिबट्याने त्याला काही अंतर ओढत नेले .

त्यानंतर आरडाओरड ऐकून त्याचे दोन-तीन सोबती त्याला वाचवण्याकरता धावले. मात्र संबंधित प्राण्याने त्यांच्यावर सुध्दा हल्ला केला . तरीपण आरडाओरड केल्यामुळे नंतर तो जंगलाच्या दिशेने पळून गेला. ही घटना रात्री 12:30 वाजता ची आहे . रात्र गावात लाईट नसल्यामुळे सर्वीकडे अंधारच पसरलेला होता . त्यामुळे प्रत्यक्ष तो वाघ आहे की बिबट्या हे सांगणे शक्य नसले. तरी त्यांच्या नुसार वाघच असल्याचे म्हटले जात आहे. घटनेची माहिती मिळताच तात्काळ आलेवाही वनरक्षक प्रशांत गायकवाड व त्यांचे सहकारी उईके हे घटनास्थळी पोहोचले .
त्यानंतर जख्मीला वाढोणा येथील प्राथमिक स्वास्थ्य केंद्र येथे नेण्यात आले. व त्याच्यावर प्राथमिक उपचार करून नंतर त्याला चंद्रपूरला रेफर करण्यात आले. घटनेची पुढील चौकशी व प्राण्याबद्दल ची माहिती लवकरच उपलब्ध होईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here