स्वाब नेचर केअर संस्था चे वतीने ‘प्लास्टिक मुक्त अभियान’ संपन्न

0
471

आज दिनांक 15/08/2021 रोजी वनपरिक्षेत्र तळोधी(बा.) व ‘स्वाब नेचर केयर संस्था’ सावरगाव यांचे संयुक्त विद्यमाने मौजा सारंगड सातबहिणी पहाडी येथे “प्लास्टिक मुक्त पर्यावरण अभियान” संकल्पनेतून पी.आर.टी. टीम ची कार्यशाळा सकाळी 10.00 वाजता पासून घेण्यात आली.
नेहमी प्रमाणे राबविण्यात येत असलेल्या ‘स्वाब नेचर केअर संस्था’चे वतीने ‘प्लास्टिक मुक्त पर्यावरण’ अंतर्गत पेरजाग़ड ( सातबहीनी) डोंगर पायथा ते शिखरा पर्यंत संपूर्ण परिसर डोंगर परिसरातील प्लास्टिकच्या पिशव्या, बाटल्या, दारू बाटल्या, गोळा करून त्यांची विल्हेवाट लावण्यात आली. या ठिकाणी उपस्थित तळोधी (बा.) वनपरिक्षेत्र अंतर्गत PRT सदस्य, यांना यात मानव व वन्यजीव संघर्ष या विषयाला अनुषंगाने मार्गदर्शन देण्यात आले. “पी.आर.टी. च्या चमू ला, मानव व वन्यजीव या विषयासोबत पर्यावरण बद्दल माहिती असायला हवी , आवड निर्माण व्हावी हा सुद्धा यामागचा उद्देश आहे. पर्यावरणातील छोटा किटक, अळी असो किंवा पक्षी, साप, आणि वाघ हे जिवन साखळी मध्ये प्रत्येक महत्वाचे घटक आहेत. आणि मानवी जिवनात त्यांची अत्यंत आवश्यकता आहे.आपल्याला त्याच्या संवर्धनासाठी, संरक्षण करण्यासाठी प्रयत्न करावे लागतील.


मानव व वन्यजीव संघर्ष या संदर्भात आपण खूप चांगल काम करत आहात. वन्यप्राणी, पक्षी, वन्यजीवाविषयी अधिक माहिती घेऊन आपल्या ज्ञानात भर घालून मानव वन्यजीव संघर्ष होणार नाही यासाठी काम करायचे आहे.” असे मार्गदर्शन करताना ‘स्वाब नेचर केअर संस्था चे अध्यक्ष व मार्गदर्शक यशवंत कायरकर हे म्हणाले.
यानंतर सातबहिणी डोंगर शिखर ते डोंगर पायथा ‘पर्यावरण प्लास्टिक मुक्त’ अभियाना अंतर्गत सर्व परिसराची दुपारी 4.00 वाजता पर्यंत साफ सफाई करण्यात आली.
या ठिकाणी गोविंदपुर चे क्षेत्र सहाय्यक आर.एस. गायकवाड सर, येनुली चे वनरक्षक गौरकर, तळोधी बा.चे वनरक्षक पेंदाम, गोविंदपुर चे वनरक्षक चहांदे, सारंगड च्या वनरक्षक सौ. एस.एम. जुमनाके मॅडम, उपस्थित होते.
स्वच्छता अभियानात कोजबी, वैजापूर, सारंगड, सोनापूर, कच्चेपार,गोविंदपुर,गिरगाव, सावरगाव येथिल पी.आर. टी. टिम वेळेवर उपस्थित होती. तर स्वाब नेचर केअर संस्था’चे उपाध्यक्ष स्वप्निल बोधनकर, सह सचिव हितेश मुंगमोडे, कोषाध्यक्ष गोपाल कुंभले, सदस्य,जिवेश सयाम, विकास बोरकर, महेश बोरकर, प्रतिकार बोरकर, सचिन निकुरे, वेदप्रकाश मेश्राम, इत्यादी सदस्य उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here