स्वॅब नेचर केअर संस्था व अ. भा. अंधश्रद्धा निर्मूलन समिती तालुका शाखा नागभिडच्या वतीने गुगल मीटवर ‘पर्यावरण आणि सर्पविज्ञान’ हे प्रबोधनात्मक कार्यक्रम

0
498

तळोधी (बा.)

नागपंचमी निमित्ताने आँनलाईन ‘साप पर्यावरण व सर्पविज्ञान’ ही मार्गदर्शन कार्यशाळा घेण्यात आली.
साप हा पर्यावरणातील महत्त्वाचा घटक आहे. आपण साप मारले तर अॅंटी स्नेक व्हेनम् कसे बनवता येईल? सापाच्या विषापासूनच इतरही औषधे बनविली जातात. साप हा सजिवांच्या अन्न साखळीतील महत्त्वाचा घटक आहे. मात्र सापांची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे. त्याचे परिणाम मानवाला भोगावे लागत आहे. मानवच पृथ्वीच्या विनाशास कारणीभूत आहे. असे मत पर्यावरणवादी मित्र मंडळाचे अध्यक्ष अमोद गौरकार यांनी स्वॅब नेचर केअर संस्था व अ. भा. अंधश्रद्धा निर्मूलन समिती तालुका शाखा नागभिडच्या वतीने गुगल मीटवर आयोजित ‘पर्यावरण आणि सर्पविज्ञान’ या प्रबोधनात्मक कार्यक्रमात मार्गदर्शन करताना बोलत होते. त्यांनी सहभागी श्रोत्यांच्या शंकांचे निरसन केले.
दुसरे मार्गदर्शक, वन्यजीव अभ्यासक उमेशसिंह झिरे यांनी कुत्रा, साप किंवा विंचू आणि जादूटोणा विरोधी कायदा समजावून सांगितला. एखाद्या व्यक्तीला कुत्रा,साप किंवा विंचू चावल्यास, त्याला वैद्यकीय उपचार घेण्यापासून रोखल्या जात असेल,मंत्र तंत्र, गंडेदोरे करून उपचार केले जात असेल तर अशा मांत्रिका विरुद्ध जादूटोणा विरोधी कायद्यानुसार गुन्हा दाखल केला जाऊ शकतो. असे मत त्यांनी व्यक्त केले. दर्शकांनी विचारलेल्या प्रश्नांना त्यांनीही उत्तरे दिली.
या कार्यक्रमात अ. भा.अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे महाराष्ट्र राज्य संघटक हरिभाऊ पाथोडे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. त्यांनीही याप्रसंगी आपले मत व्यक्त केले. तळोधी बाळापूरचे वनपरिक्षेत्राधिकारी के.आर. धोंडणे यांनीही साप वाचविण्याचे आवाहन केले. या कार्यक्रमात बहुसंख्य श्रोता सहभागी झाले होते.
या मार्गदर्शन कार्यशाळा मध्ये सापांबध्दल अतीशय महत्त्वपूर्ण माहिती, मार्गदर्शन देण्यात आली. प्रमुख मार्गदर्शक म्हणून अमोद भाऊ गौरकर, अध्यक्ष पर्यावरण मित्र मंडळ शंकरपुर, व श्री उमेश भाऊ झिरे, वन्यजीव संरक्षक मुल, हे होते तर के.आर.धोडने, वनपरिक्षेत्र अधिकारी तळोधी, व पाथोडे, अ.भा अनिस महाराष्ट्र संघटक, हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक स्वॅब नेचर केअर संस्था चे अध्यक्ष यशवंत कायरकर यांनी, संचालन अनिल लोनबले यांनी तर आभारप्रदर्शन अ.भा.अंनि.स.चे नागभिड तालुका संघटक संजय घोनमोडे यांनी केले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी किशोरशाह आत्राम, हितेश मुंगमोडे, स्वप्नील बोधनकर, जिवेश सोयाम,भारत चुनारकर यांनी सहकार्य केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here