राजुरा वनपरिक्षेत्रात रेल्वेच्या धडकेत एक अस्वल ठार

0
268

चंद्रपूर :- राजुरा वनपरिक्षेत्रातील विरगाव उपक्षेत्र मूर्ती कक्ष क्रमांक 200 मधून जाणाऱ्या मध्ये रेल्वे मार्गात रेल्वेच्या धडकेत एक अस्वल ठार झाल्याची घटना दिनांक 18 मई 2022 रोजी सकाळच्या सुमारास उघडकीस आली.

सदर घटनेची माहिती वनविभागाला मिळताच वनपरिक्षेत्र अधिकारी विदेश कुमार गलगट, क्षेत्रसहायक नरेंद्र देशकर, वनरक्षक सायस हाके, संजय सुरवसे आणि वनमजुर घटनास्थळी दाखल झाले व मौका पंचनामा करून राजुरा येथील काष्ठ आगारात शवविच्छेदन करण्यात आले.
प्राप्त माहितीनुसार चुनाला ते विरूर मार्गाच्या मध्य रेल्वे रुळावर अनेक वन्यजीव बळी जात असून अतिशय गंभीर बाब आहेत वन प्रशासनाने याकडे लक्ष देण्याची अत्यंत गरज आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here