
नागभिड तालुक्यात आठवड्यातील ही दुसरी घटना
जिल्हा प्रतिनिधी (यश कायरकर) : नागभिड तालुक्यातील चिंधी (माल) येथील लहान मुलीचा सर्पदंशाने मृत्यू झाल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे.
सविस्तर वृत्त याप्रमाणे आहे की, दि.19 जुलै 2023 रोजी रात्री पहाटेच्या सुमारास कु. अफसरा विलास सुतार, वय (११ वर्ष) ही आपली आजी व भावां सोबत घरात झोपेत असताना मन्यार हा विषारी साप चावल्याने मृत्यू झाल्याची घटना आज दि. 20 जुलै रोजी उघडकीस आली .
सदर घटना ही पहाटेला 3:20 वाजताच्या सुमारास गाढ़ झोपे मध्ये असताना विषारी सापाने चावा घेतल्यानंतर तिला नागभीड येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले. मात्र तिथे पोहचे पर्यंत अफसराचा मृत्यू झालेला होता.
मृतक ही कर्मवीर विद्यालय कॉलेज नागभीड येथे ५ व्या वर्गात शिकत होती. तिचे आई वडील हे ओडिसा मध्ये व्यवसाय करायला गेलेले आहेत. यापूर्वी देखील १२ जुलै ला नागभीड तालुक्यातील ओवाळा येथील अमित संतोष महाडोळे वय (१२) वर्षे याचा सुद्धा सर्पदंशाने मृत्यू झालेला होता.
पावसाळ्याच्या दिवसांच्या सुरू झाल्यामुळे सापांच्या बिळाच्या पाण्याचा साचना होता, ज्यामुळे आजूबाजूच्या परिसरात साप गावातील घरांत, गोठांत सुकलेल्या जागेच्या शोधात येतात. त्यामुळे लोकांना काळजी घ्यायची आवश्यकता आहे आणि कोणताही विषारी साप चावा घेतला तर सर्व प्रथम शासकीय रुग्णालय गाठून प्राथमिक उपचार करून सर्पदंश झालेल्या व्यक्तीच्या जीव वाचवता येऊ शकतो. तेव्हा काळजी घ्या आणि परिसर स्वच्छ ठेवा असे परिसरातील वन्यजीव प्रेमी म्हणत आहे
