चिमूर तालुक्यातील ब्राह्मणगाव येथे वाघाच्या हल्ल्यात ६० वर्षीय ईसम ठार

0
204

( पंधरवाड्यात जिल्ह्यातील वाघाच्या हमल्याची चौथी घटना, चिमूर तालुक्यात तीन शेतकरी, गुराखी तर तळोधी बा.अप्पर तालुक्यात एक शेतकरीन मृत)

जिल्हा प्रतिनिधी (यश कायरकर) : –
ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पालगत असलेल्या बाम्हणगाव येथे दि. १८ जुलै २०२३ रोजी दुपारच्या सुमारास वाघाच्या हल्ल्यात शेतकरी ऋषीं किसन देवतळे वय ६० वर्षे हा इसम बाम्हणगांव तालुका चिमूर येथील रहिवासी मृत झाल्याची घटना उघडकीस आली.
सदर घटना ही बफर क्षेत्रात घडली असून मृतकाचे शव शवविच्छेदन करण्याकरीता उपजिल्हा रुग्णालय चिमूर येथे नेण्यात आले आहे.
सदर घटना या पंधरवड्यामध्येच चिमूर तालुक्यामध्ये तीन तर तळोधी (बा.) अप्पर तालुक्यामध्ये एक घटना घडली त्यामध्ये पहिली घटना चिमूर तालुक्यातील (नेरी) सावरगाव येथे एक शेतकरी ठार, दुसरी घटना तळोधी बाळापुर परिक्षेत्रातील आकापुर येथे एका महिला शेतकरी ठार, त्यानंतर चिमूर तालुक्यातील शंकरपूर परिसरातील डोमा येथे एका गुराख्याचा मृत्यू व त्यानंतर आता हे परत चिमूर तालुक्यात बाम्हनगाव येथील शेतकरी मृत, अशा या घटना सतत वेगवेगळ्या ठिकाणी, वेगवेगळ्या पध्दतीने कधी वाघाची तर कधी गुराखी यांच्या चुकीमुळे या वाघाच्या हमल्यात  पंधरवड्याच्या हि चार व्यक्ती मृत पावल्याच्या घटना घडली असून वनविभागात आणि परिसरात खळबळ निर्माण झाली आहे.
अशा प्रकारच्या घटना कशा पद्धतीने टाळता येतील  व त्यावर काय उपाय योजना केल्या जातील याबद्दल  वनमंत्र्यांनी, वरिष्ठ अधिकाऱ्यांनी, गांभीर्याने विचार करून या घटनेवर पूर्णपणे तर शक्य नाही मात्र काही प्रमाणात कसा आळा घातला जाईल या करिता पर्यावरण मित्र, वाघ अभ्यासक, आणि पर्यावरण प्रेमी संस्था यांच्या मदतीने वन विभागाने कार्य करणे अत्यंत आवश्यक झालेले आहे. अशा वाघाच्या हल्ल्याच्या घटना घडल्यानंतर प्रत्येकी 20 लाख रुपये प्रमाणे, करोडो रुपये महिन्याला खर्च करण्याऐवजी त्या घटना टाळून नेण्याकरिता जर कार्यक्रम राबवून त्याकरिता फक्त काही हजार रुपये खर्च केले तरी या घटनांच्या प्रमाणावर थोडा निर्बंध आणता येऊ शकते.
सध्या शेतीचा हंगाम सुरू असल्याने परिसरात धान रोवनीची कामे मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. याकरिता शेतात शेतकऱ्यांची धावपळ मोठ्या प्रमाणावर सुरू असते. अशावेळेस वाघाच्या हल्ल्याच्या घटनेबनंतर त्या परिसरातील शेतकऱ्यामध्ये भीतीचे वातावरण निर्माण होत असल्याने  शेतात कामाला जाणे किंवा त्या शेतामध्ये काम करायला मजूर मिळणे कठीण होऊन लागले आहे.

जंगलालगत असलेल्या गावकऱ्यांना या वन्य प्राण्यापासून कशा प्रकारे बचाव करता येईल याची काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. वनविभागाने यापुढे अशा प्रकारच्या घटना घडू नये याकडे लक्ष द्यावे अशीही मागणी ग्रामस्थाकडून केली जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here