मा.खासदार बाळू भाऊ धानोरकर व शिवसेना जिल्हाप्रमुख मा. संदीप भाऊ गिऱ्हे यांनी दिला नितीन भटारकर यांच्या उपोषणाला पाठींबा

0
236

चंद्रपूर:– दुर्गापूर, उर्जानगर व लगतच्या परिसरात होत असलेल्या वाघांच्या हल्ल्यात सतत सर्वसामान्य नागरिकांचा जीव जात असल्याने वन विभागाच्या निष्क्रिय कार्यप्रणालीच्या विरोधात आमरन उपोषनाची सुरुवात नितीन भटारकर यांनी दिनांक १७ फेब्रुवारी २०२२ पासुन केली आहे.

सदर ज्वलंत विषया संदर्भात या उपोषणाला सर्वसामान्य नागरिकांसह अनेक संघटनांनी आपला पाठिंबा देऊन जाहीर समर्थन दिले आहे.

तसेच आज मा. खासदार बाळू भाऊ धानोरकर, शिव सेनेचे जिल्हाप्रमुख मा. संदीप भाऊ गिर्हे व काँगेस चे महाराष्ट्र प्रदेश सचिव मा. विनोद भाऊ दत्तात्रेय यांनी स्वतः आपल्या पदाधिकाऱ्यांसह उपोषणास्थळी येऊन पाठींबा दिला असल्याने या आंदोलनाला अधिक बळ मिळाले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here