Google search engine
Home Breaking News चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्र वसाहतीत एक वाघाला जेरबंद करण्यात वनविभागाला मिळाले यश

चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्र वसाहतीत एक वाघाला जेरबंद करण्यात वनविभागाला मिळाले यश

0
487

मागील अनेक दिवसापासून CTPS परिसरातील वाघांचा वावर असल्याचे दिसून येत आहे. दिनांक 16 फरवरी 2022 बुधवार रोजी चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्रात काम करणारा कंत्राटी कामगार कामावरून परत घराकडे जात असताना त्याच्यावर वाघाने हल्ला करून ठार केल्याची घटना उघडकीस आली होती.

सदर घटना ताजी असतांना परिसरात  एका १६ वर्षाच्‍या मुलाचा बिट्याने उचलून नेल्याची घटने ने परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून ग्रामस्थांनी वाघाचा बंदोबस्त करण्याची मागणी केलेली होती तसेच राजकीय पक्षाच्या नेत्यांनी, सामाजिक कार्यकर्ता व वन्यजीव प्रेमी यांनी सुध्दा वाघाचा बंदोबस्त  करण्याबाबत शासनाकडे निवेदन केले होते. याकडे लक्ष देत  NTCA ने  वाघाला जेरबंद करण्याचे आदेश वन विभागाला मिळताच आज दिनांक 21 फरवरी 2022 रोजी वन विभागाचे अधिकारी व रेस्क्यू टीम ने वाघाचा शोध सुरू केला असता रात्री 9.30 वाजताच्या सुमारास उर्जानगर वसाहतीतील पर्यावरण चौकाच्या न्यू F Type  कॉटर जवळ एका वाघाला डॉट मारून त्याला शांत करून पिंजऱ्यात पकडण्यात आले.

मिळालेल्या माहितीनुसार CTPS परिसराला No Tiger Zone करण्यात येत आहे.

सदर प्रकरणात चंद्रपूर वनविभागाच्या अधिकाऱ्यांना वाघाला जेरबंद करण्यात यश मिळाले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here