रामटेक वनपरिक्षेत्रातील शेतातील विद्युत प्रवाहच्या जिवंत करंटने वाघाचा मृत्यु

0
184

चंद्रपूर (मोहम्मद सुलेमान बेग):

रामटेक वनपरिक्षेत्रातील मनसर नियत क्षेत्रात दि. 19 ऑगस्ट 2023 रोजी शेतामध्ये मृत वाघ गस्त दरम्यान दिसून आल्याने वन विभागात खळबळ उडाली.
रामटेक वनपरिक्षेत्राचे कर्मचारी सायंकाळच्या सुमारास  गस्त करीत असताना मनसर नियरक्षेत्र येथील मौजा बोंद्री येथील शेत सर्वे क्र. 129  या शेतात 5 ते 6 वर्षाचा वयाचा वाघ मृत अवस्थेत दिसून आले.
सदर घटनेची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळविण्यात आले व घटनास्थळी पाहणी केली असता प्राथमिक माहितीनुसार वाघाचा मृत्यू विद्युत शॉक लागल्याने झाले असल्याचे निर्देशनास आले.
सदर शेतात काम करणारे 2 आरोपींना चौकशी करिता  ताब्यात घेऊन अटक करण्यात आले.
रात्र झाली असल्यामुळे वाघाचे शवविच्छेदन दुसऱ्या दिवशी सकाळी करण्याचे  ठरविल्यामुळे मृत वाघाचे शव TTC नागपूर येथे हलविण्यात आले तसेच दि. 20 ऑगस्ट 2023 रोजी NTCA च्या मार्गदर्शनानुसार तयार केलेल्या समितीचे सर्व सदस्यांच्या उपस्थितीत मृत वाघाचे TTC नागपूर येथे शवविच्छेदन करून दहन करण्यात आले.


यावेळी समितीचे सदस्य भगतसिंग हाडा भा.व.से. उपवनसंरक्षक नागपूर वन विभाग नागपूर, हरवीर सिंह भा.व.से. सहायक वनसंरक्षक जंकास -1 रामटेक, अजिंक्य भटकर, NTCA चे प्रतिनिधी, अविनाश लोढे PCCF (WL) चे प्रतिनिधी, डॉ. राजेंद्र रेवतकर पशुवैद्यकीय अधिकारी प्रथम श्रेणी-1 कांद्री, डॉ. स्मिता रामटेके पशुघन विकास अधिकारी प्रथम श्रेणी-1 सिरसी (उमरेड), डॉ. रोहिणी टेंभुर्ने पशुवैद्यकीय अधिकारी अ.प्र.मु.व.सं. (वन्यजीव) पूर्व, डॉ. सुदर्शन काकडे पशुवैद्यकीय अधिकारी TTC नागपूर, डॉ. राजेश फुलसुंगे वैद्यकीय अधिकारी TTC नागपूर, डॉ. सुजित कोलंगत पशुवैद्यकीय अधिकारी WRTC गोरेवाडा नागपूर, कुंदन हाते आदी उपस्थित होते.
शेतात विद्युत करंट लावून वन्यप्राणी वाघाचा मृत्यू प्रकरणी अटक केलेल्या 2 आरोपींना मान. न्यायालयात दाखल करण्यात आले व मान. उपवनसंरक्षक  भगतसिंह हाडा भा.व.से. यांच्या मार्गदर्शनाखाली  हरवीस सिंह भा.व.से. सहायक वनसंरक्षक जंकास -1 रामटेक पुढील तपास करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here