वाघाच्या हल्ल्यात रोजनदार मजूर ठार: ताडोबा (बफर) रामदेगी निमडला  प्रवेशद्वार वरील घटना

0
1421

चंद्रपूर : ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाअंतर्गत येते असलेल्या खडसंगी वनपरिक्षेतत्रातील कक्ष क्र. 59 लगत (बफर) रामदेगी निमडला पर्यटन प्रवेशद्वारवर सकाळच्या सुमारास कुठीच्या समोर देव बाबरीत असलेल्या वाघाने हल्ला करून  रोजंदारीने सफाई कामगार म्हणून काम करत असलेला रामचंद्र हनवते वय (52) वर्ष  यांना जागेच ठार केले.

प्राप्त माहिती नुसार (रामदेगी) बफर क्षेत्रात सध्या भानुसखिंडी नामक वाघीणीचे शावक, मटकासूर, बबली असे वाघांचे पर्यटकांना दर्शन होत असते. त्यातील बबली नामक वाघीण नवेगाव मेडोव क्षेत्रात सद्या दिसत आहे . तेव्हा हल्ला करणार वाघ हे भानुसखिंडीचा शावक असल्याचे सूत्राद्वारे म्हटले जात आहे.

हे शावक नेहमीच रामदेगी मध्ये येत असलेल्या भाविकांवर चार्ज करत असल्याचे सांगीतले जात आहे. सदर घटनेची माहिती ग्रामस्थांना होताच मोठ्या प्रमाणात नागरिकांनी गर्दी केली व   वनविभागानां माहिती होताच घटनास्थळी आपल्या टीम सोबत दाखल झाले व तसेच शेगाव पोलीस देखील घटनास्थळी दाखल झाले.
सदर घटनेची मौका पंचनामा करून ताडोबा बफर क्षेत्राचे वनपरिक्षेत्र अधिकारी किरण धानकुटे यांच्या मार्गदर्शनात पुढील चौकशी केले जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here