गडचिरोली जिल्ह्यात एका वाघाची शिकार, तीन पंजे व जबडा गायब

0
453

गडचिरोली वनविभागाच्या चातगांव वनपरिक्षेत्रातील घटना
(मृत वाघाचे तीन पाय व तोंडाचा मिशीचा भाग जबड्यासहित कापलेल्या स्थितीत आढळले)

यश कायरकर:  दिनांक 24.10.2023 रोजी सकाळी 7.00 वा नियतक्षेत्र अमिर्झा, उपक्षेत्र अमिर्झा, वनपरीक्षेत्र – चातगाव, गडचिरोली वनविभाग मध्ये मिळालेल्या माहीती अनुसार कक्ष क्रमांक 417 जंगलामध्ये एक नर वाघाचा मृतदेह आढळून आला. नर वाघाचे वय पशुवैद्यकिय अधिकारी यांचे तपासणीनुसार 3 ते 4 वर्ष असल्याची शक्यता आहे. सदर घटनेची माहीती मिळताच घटनास्थळी उपवनसंरक्षक गडचिरोली वनविभाग गडचिरोली, विभागिय वनअधिकारी (दक्षता) वनवृत्त गडचिरोली, सहाय्यक वनसंरक्षक (जंकास) गडचिरोली वनविभाग, वनपरीक्षेत्र अधिकारी चातगाव, क्षेत्र सहाय्यक अमिर्झा, नियत वनरक्षक अमिर्झा यांनी सदर घटनेची तपासणी केली. प्रथम दर्शनी वाघाचा मृत्यू विजेच्या धक्क्याने (Electrocution) झाले असल्याचे डॉ. आशिष भोयर पशुवैद्यकिय अधिकारी व उपस्थित अधिकाऱ्यांचे निदर्शनास आले. मृत वाघाचे तीन पाय व तोंडाचा मिशीचा भाग जबड्यासहित कापलेल्या अवस्थेत असल्याचे दिसून आले असून या सर्व बाबींचा कसून शोध घेणे चालु आहे. प्राप्त माहीतीचे अनुषंगाने घटनेतील संशयीत व्यक्तींची तपासणी केली जात आहे. सदर घटनेबाबतची चौकशी, चौकशी अधिकारी तथा सहाय्यक वनसंरक्षक (जंकास)  संकेत वाठोरे हे करीत आहेत. याबाबत कोणतेही नागरीकांस अधिकची माहीती प्राप्त झाल्यास त्यांनी चौकशी अधिकारी तथा सहाय्यक वनसंरक्षक (जंकास)  संकेत वाठोरे (मो.नं. 7678651163) यांना तात्काळ कळवावे. असे आवाहन मा. उपवनसंरक्षक गडचिरोली, वनविभाग गडचिरोली यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here