३ ट्रॅक्टर आणि १ जेसीबी जप्त : सावली वनपरिक्षेत्राची धडक कारवाई

0
312

जिल्हा प्रतिनिधी (यश कायरकर) :

सावली वनपरिक्षेत्रातील उपवनक्षेत्र व्याहाड व नियतक्षेत्र सिर्सी हद्दीत मौजा कढोली गावालगत वनविभागाच्या मालकीच्या जागेत अवैध उत्खनन करून मातीची वाहतूक केल्याची माहिती मिळताच विभागाने मोठी कारवाई केली. दि. 21 नोव्हेंबर 2025 रोजी रात्री 8.00 वाजता ही कारवाई करत ३ ट्रॅक्टर आणि १ जेसीबी मशीन जप्त करण्यात आले.
रात्रीच्या गस्ती दरम्यान अनंत राखंडे (क्षेत्र सहायक, व्याहाड) व महादेव मंडे (वनरक्षक, सिर्सी) यांनी कढोली परिसरात व्यावसायिक उद्देशाने अवैध उत्खनन सुरू असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर भारतीय वन अधिनियम 1927 च्या कलम 33(1)(ई) आणि 35(1)(ग) अन्वये वन गुन्हा क्रमांक 204/232852/2025 नोंदविण्यात आला.

कारवाईत खालील वाहने जप्त करण्यात आली:

जेसीबी – MH-33/4487, रंग पिवळा
मालक – मल्लेश नरसय्या मेरफुलवार, रा. हरंबा
(चेसिस क्र. HAR3DXSSL01893466)
महिंद्रा ट्रॅक्टर B275DI – MH-34/BV-5332, रंग लाल (माती भरलेला)
चेसिस क्र. MBNADAEXLMN C01812
ट्रॉली – रंग लाल (क्रमांक नाही)
सवराज 843XM ट्रॅक्टर, रंग निळा
मालक – सौ. सिंदुबाई किसनदेव बोदलकर, रा. उपरी
चेसिस क्र. UZTB79628127986
ट्रॉली – रंग लाल (क्रमांक नाही)
सवराज 735FE ट्रॅक्टर, रंग निळा-पांढरा (क्रमांक नाही)
मालक – राजेश नामदेव सातपूते, रा. उपरी
चेसिस क्र. MBNAK49AHRTB25738
ट्रॉली चेसिस क्र. AL240315824 (रंग लाल)

वनविभागाच्या या मोहिमेत सतीश नागोसे (वनरक्षक, चितेगाव), रमेश बोनलवार (वनरक्षक, टेकाडी), सतीश मजोक, बंडू दुधे, रवी सोनुले, मारोती पिपरे, नेहरू पाल व PRT चमू सिर्सी यांनी मोलाचे सहकार्य केले.
संपूर्ण तपास राजन तलमले (विभागीय वनाधिकारी, चंद्रपूर), विकास तरसे (सहायक वनसंरक्षक, चंद्रपूर) यांच्या मार्गदर्शनाखाली विनोद धूर्वे (वनपरिक्षेत्र अधिकारी, सावली) करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here