वनपालांची प्रलंबित पदोन्नती लवकरच : वनमंत्री गणेश नाईक यांचे आश्वासन

0
336

चंद्रपूर (मोहम्मद सुलेमान बेग) :

राज्यातील दीर्घकाळ प्रतीक्षेत असलेल्या वनपालांच्या वनक्षेत्रपाल पदोन्नती प्रक्रियेना गती मिळणार असून, ३० नोव्हेंबर २०२५ पर्यंत पदोन्नती आदेश जारी केले जातील, असे आश्वासन महाराष्ट्राचे वनमंत्री गणेश नाईक यांनी दिले.

नागपूर येथील हरिसिंग सभागृहात विभाग वाटप झालेल्या वनपालांच्या शिष्टमंडळाने वनमंत्र्यांना निवेदन देत चर्चा केली. यावेळी वनमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत प्रलंबित पदोन्नती लवकरात लवकर मंजूर करण्यात येतील, अशी ग्वाही दिली.

निवेदन देणाऱ्या शिष्टमंडळात विलास कोसनकर (समन्वयक), अरुण पेंदोरकर, रमेश घुटके, अनंत राखुंडे, दिनेश तेलंग, मनोज रामटेके, निशा देशमुख, डी. टी. चौधरी, दिनेश नंदेश्वर, नामदेव केंद्रे, शेषराव नारनवरे, राममोहन पेदापल्लीवार, मेघराज निबुद्धे तसेच इतर वनपाल उपस्थित होते.

राज्यात २२६ वनक्षेत्रपाल पदे रिक्त

सध्या राज्यभरात २२६ वनक्षेत्रपाल पदे रिक्त असून वनसंरक्षण, वनसंवर्धन आणि मानव–वन्यजीव संघर्ष नियंत्रणासाठी ही पदे तातडीने भरावीत, अशी मागणी या शिष्टमंडळाने केली होती.

यापूर्वी निवड व विभाग वाटप पूर्ण झालेल्या १२९ वनपालांची वनक्षेत्रपाल पदोन्नती प्रलंबित होती. ही पदोन्नतीही लवकरच मंजूर करण्यात येणार असल्याचे वनमंत्र्यांनी सांगितले.

४ दशक सेवा करून ही पदोन्नती न मिळालेल्यांवर अन्याय होणार नाही

३७ ते ३९ वर्षे सेवा करूनही अनेक वनपालांना पदोन्नती मिळाली नाही व ते वनपाल पदावरच निवृत्त झाले, या गंभीर मुद्द्याकडेही वनमंत्र्यांनी लक्ष वेधले.

त्यावर कोणत्याही वनकर्मचारी–वनाधिकारी यांच्यावर अन्याय होणार नाही आणि विभागात तसेच जनमानसात “सन्मानाचे स्थान” निर्माण होईल, याची खात्री त्यांनी दिली.

बैठकीच्या शेवटी उपस्थित सर्व वनपालांनी वनमंत्री गणेश नाईक यांचे मनःपूर्वक आभार मानले.

 

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here