पांढरकवडा येथे नखासाठी गर्भवती वाघिणीची निर्घुणपणे हत्‍या

0
467

पांढरकवडा:
यवतमाळ जिल्ह्यामधील पांढरकवडा वनविभागांतर्गत मुकुंदवाडी परिक्षेत्रातील मांगुर्ला नियतक्षेत्रातील राखीव वनक्षेत्र कक्ष क्रमांक 30 मध्ये दि. 25 एप्रिल रोजी 10.30 वाजता सकाळच्या सुमारास एका गर्भवती वाघिणीचा निर्घुणपणे हत्या करण्यात आल्याची घटना वन विभागाच्या गस्ती दरम्यान उघडकीस आली. आपल्या गुहेत वाघिण आराम करत असताना ही घटना घडली.

नाल्या जवळील एका गुहेत गर्भवती वाघिण बराच वेळ राहत होती आरोपीला याबद्दल आधीच माहिती होती गुहेचा जाण्याचा मार्ग निमुळता असल्यामुळे आरोपींनी बांबू आणि काट्याच्या सहाय्याने मार्ग बंद केले त्यानंतर बांबू आणि काट्याला आग लावली त्यामुळे वाघिणीला उसंमती केली काही वेळात वागिणीचे प्राण गेले का नाही बघण्याकरिता तीक्ष्ण हत्याराने तिच्या शरीरावर जखमा केल्या मग मेंल्याची खात्री झाल्यावर तिचे दोन पंजे कापून नेले.

घटनेची माहिती वनरक्षक यांनी आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिली. माहिती मिळताच विभागीय वन अधिकारी वन्यजीव सुभाष पुराणिक, वनपरिक्षेत्र अधिकारी व्ही.जी.वारे,मुकुतबन, वनसंरक्षक वन्यजीव प्रकाश महाजन, मानद वन्यजीव रक्षक डॉ. रमजान विराणी घटनास्थळी उपस्थित झाले. तपास दरम्यान वाघिणीच्या गळ्यात ताराचा फास दिसून आला, बांबूचे काट्या, क्लच वायर आणि जाळल्याच्या जखमा दिसून आले.

पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. चेतन पातोड ,पेंच व्याघ्र प्रकल्प नागपूर, डॉ. अरुण जाधव, वणी, डॉ.एस. एस. चव्हाण, झरी, डॉ. डी. जी. जाधव, मुकुटबन, डॉ. व्ही. सी. जागडे मारेगांव यांनी शवविच्छेदन केले. गर्भवती वाघिणीचा पोटात चार बछडे होते.गर्भवती वाघिण जवळपास चार वर्षाची होती.

यवतमाळ जिल्ह्यातील एका महिन्यातील ही दुसरी घटना आहेत तर राज्यात या वर्षी 17 वाघांचे मृत्यू झालेले आहेत राज्यात शिकारीचे प्रमाण फार वाढलेले दिसून येत आहे त्यात एक घटना नका साठी गर्भवती वाघिणीचा जीव गेला व त्यासोबत पोटात असलेले चार बछडे ही मारले गेले एवढ्या निर्घुण हत्यामुळे वन्यजीवप्रेमी मध्ये आरोपी विषयी रोष निर्माण झालेला आहे या प्रकरणातील आरोपीवर कारवाई करण्याची मागणी करीत आहेत.

सदर प्रकरणी प्राथमिक वन गुन्हा जारी करून गुन्ह्याचा तपास सहाय्यक वनसंरक्षक (जंकास व कॅम्पा) पांढरकवडा हे करीत आहेत

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here