सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील दुर्मिळ ग्रिफॉन गिधाडची पहिल्यांदाच नोंद

0
228

हा पक्षी तिबेट ,कझाकिस्तान, उझबेकिस्तान, किर्गिस्तान, ताजिकिस्तान, अफगाणिस्तान आणि पाकिस्तान ते हिमालय नेपाळ, भूतान ते पश्चिम चीन आणि मंगोलिया दक्षिणेकडील युरोप, उत्तर आफ्रिका या भागात मुख्य्तो आढळतो.

हजारो किलोमीटर चा हा प्रवास करीत असतो. आकाशात उंच अश्या घिरट्या घालत आपले अन्न शोधत असतो.

ह्या पक्ष्याचे इंग्रजी नाव  ग्रिफॉन वलचर  शास्त्रीय नाव गीप्स फुल्वस असे आहे ,
हा एक अत्यंत मोठा पक्षी असून त्याची उंच साधारणपणे  १२५ से.मी. असते.
तर दोन पंखांची लांबी साधारण ८ ते ९ फुटापर्यंत भरते .

नर व मादी ग्रिफॉन गिधाडाचे वजन ८ ते १० kg किलो पर्यंत नोंदवले गेले आहे ,

ही एक दुर्मिळ गिधाड प्रजाती आहे.  ज्याचे डोक्यावर पंख पांढरे शुभ्र असतात तर पाठीवरचे पंक फार रुंद व तांबूस असतात व शेपटीचे पंख हे डार्क चॉकलेटी असतात.
इतर गिधाडांप्रमाणेच, हा स्केवेंजर ( कुजलेले व सडलेले मांस खाणारा ) आहे
उंच कड्यांवर घरटे बनवतात
तिबेट , कझाकिस्ता, उझबेकिस्तान, किर्गिस्तान, ताजिकिस्तान, अफगाणिस्तान आणि पाकिस्तान ते हिमालय नेपाळ, भूतान ते पश्चिम चीन आणि मंगोलिया दक्षिणेकडील युरोप, उत्तर आफ्रिका येथील पर्वतांमध्ये ते प्रजनन करतात आणि एक अंडे देतात.

अलीकडेच सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील जंगली जयगड भागात गस्त घालत असताना वनरक्षक संतोष चाळके यांना हा पक्षी जंगली जयगड परिसरात उडताना घिरट्या मारताना दिसला. त्यांनी त्याला केमेरा बद्द केले.

त्यांनी अधिक अभ्यासाठी हा फोटो पक्षी तज्ञ व मानद वन्यजीव रक्षक रोहन भाटे यांना दिले. फोटो मध्ये सदर गीधाडावर अभ्यासाठी
उजव्या पंखावर नारंगी टॅग लावलेले दिसत आहे.
सह्याद्री व्याघ्र प्रकल्पचे क्षेत्रसंचालक समाधान चव्हाण, उपसंचालक उत्तम सावंत , सहायक वनसंरक्षक सुरेश साळुंखे, वनक्षेत्रपाल संदीप कुंभार यांनी संतोष चाळके यांचे ह्या दुर्मिळ नोंदणीसाठी कौतुक व अभिनंदन केले आहे.

सदर गिधाड हे शास्त्रीय व स्थलांतराचे अभ्यासाठी कोणत्यातरी अभ्यासकाने हे टॅग लाऊन सोडलेले आहे, त्याबद्दलची माहिती घेण्यासाठी वेगवेगळ्या देशात गिधाडांवर अभ्यास करणाऱ्या संशोधकांना व गिधाडं वर अभ्यास करणाऱ्या आंतरराष्ट्रीय संस्थाना संपर्क करून त्यांना ह्या नोंदीची माहिती आम्ही कळवली आहे.

रोहन भाटे
पक्षी तज्ञ व मानद वन्यजीव रक्षक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here