बल्लारशाह वनपरिक्षेत्रातील कारवा उपक्षेत्रात आढळले वाघिनी चे मृतदेह

0
589

चंद्रपुर :

बल्लारशाह वनपरिक्षेत्रा अंतर्गत कारवा १ बिटातील कक्ष क्र. ५०० मध्ये दि. २७/११/२०२१ रोज मादा वाघिन मृतावस्थेत आढळुन आली. वाघिनचे वय अंदाजे ५ ते ६ वर्ष असून मृतदेह ३ ते ४ दिवसापुर्वीचे असल्याची शक्यता दर्शविली जात आहे. वाघाचे शवविच्छेदन NTCA च्या मार्गदर्शक तत्वानुसार त्यांचे प्रतिनिधीं डॉ. विलास ताजणे पशुधन विकास अधिकारी व डॉ. कुंदन पोडचेलवार पशुवैद्यकिय अधिकारी ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प यांच्या समक्ष करण्यात आले.
प्राप्त माहितीनुसार मृत वाघिने सर्व अवयव सबूत आहे. वाघिने चे मृत्यु कशा ने झाले हे माहित करून घेण्यासाठी व्हिसेरा सॅम्पल प्रयोगशाळेत पाठविण्यात येत आहे.

मध्यवर्ती रोपवाटीका कारवा येथे शवविच्छेदना नंतर दहन करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here