सामूहिक वनहक्क प्राप्त ग्रामसभेने वनसंपदेचे जतन व व्यवस्थापन करावे – अमित कळस्कर, सेवा निवृत्त मुख्य वनसंरक्षण

0
259

नागभिड : यश कायरकर.

तालुक्यातील अतिदुर्गम आदिवासी कोरंबी या सामुहिक वनहक्क प्राप्त ग्रामसभा सक्षमीकरण संदर्भात विशेष कार्यक्रमाचे आयोजन सामूहिक वनहक्क व्यवस्थापन समिती द्वारे दिनांक 26 नोव्हेंबर रोजी संपन्न झाले.या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून सेवानिवृत्त मुख्य वनसंरक्षक अमित कळस्कर होते तर प्रमुख अतिथी तथा मार्गदर्शक म्हणून दिलीप गोडे, कार्यकारी संचालक विदर्भ निसर्ग संरक्षण संस्था नागपूर हे होते, अध्यक्ष म्हणून माझी उपसरपंच केशवजी खंडाते हे होते कोरंबी ग्रामसभेचे अध्यक्ष केशव जांभुळे सचिव बाबुराव जुगनाके कोषाध्यक्ष कैलास ननावरे, आशा आडे, येमता खंडाते, सल्लागार चरणदास मसराम, शकर ननावारे पोलीस पाटील भोजराज इरपाते व इतर पदाधिकारी यांची उपस्थिती होती. या कार्यक्रमात 200 च्या वर ग्रामस्थ सहभागी होते. यावेळी ग्रामसभेच्या वतीने गावात सर्वत्र घरोघरी व मुख्य रस्त्यांवर रांगोळी काढून व ठिकाणी नैसर्गिक फुलांची सजावट करून गावाला सजविण्यात आले होते. गावात पाहुण्याचे आगमन होताच प्रवेशद्वारावर पाहुण्यांचे जंगी स्वागत गावकऱ्यांच्या वतीने करण्यात आले पारंपारिक वाद्य, लेझीम, भजन मंडळ या पथकांत सह सजावट केलेल्या बैलबंडी ने पाहुण्यांना कार्यक्रम स्थळापर्यंत आदर तिठ्याने नेण्यात आले. त्यानंतर स्वागत गीत व कमलपुष्प देऊन पाहुण्यांच्या स्वागताचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाचे उद्घाटक अमित कळसकर यांनी मार्गदर्शन करताना गाव परिसरात उपलब्ध असलेली विपुल वनसंपदेचे वन हक्क प्राप्त कोरंबी ग्रामसभेने जतन व व्यवस्थापन करावे, गौण वनउपजाचे संकलन करून लोकांना रोजगार उपलब्ध करावे असे मौलिक मार्गदर्शन केले. या कार्यक्रमात विदर्भ निसर्ग संरक्षण संस्था नागपूर चे कार्यकारी संचालक दिलीप गोडे यांनी सन 2021 मधील तेंदूपत्ता संकलन व विपणन साठी विशेष मार्गदर्शन व सहकार्य केले यास्तव त्यांचा शाल व श्रीफळ देऊन ग्रामसभा कोरंबी च्या वतीने यावेळी सत्कार करण्यात आला. याप्रसंगी उपस्थित ग्रामस्थांना दिलीप गोडे यांनी मौलिक मार्गदर्शन केले व कोरंबी ग्रामसभेच्या वतीने वनहक्काची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी गावात एकीचे वातावरण राहील व ग्रामसभेच्या सक्षमीकरनातून गाव विकासाला चालना देण्यासाठी ग्रामसभेने पुढे कार्य करावे त्यासाठी विदर्भ निसर्ग संरक्षण संस्था आणि रीवार्डस संस्था च्या वतीने हवे ते सहकार्य व मार्गदर्शन केले जाईल, गावाच्या परिसरात जल जंगल जमीन सुजलाम सुफलाम करून लोकांचे जीवनमान सुधारण्याचा मूलमंत्र त्यांनी ग्रामस्थांना आपल्या मार्गदर्शनातून दिला. कोरंबी ग्रामसभेच्या वतीने एकोप्याने भव्य दिव्य कार्यक्रमाची तयारी पाहून आम्ही भारावून गेलो असून या गावाने आरंभलेले कार्य कौतुकास्पद आहे असे प्रतिपादन दिलीप गोडे यांनी यावेळी केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक ग्रामसभेचे अध्यक्ष केशव जांभुळे यांनी केले, संचालन प्रमोद कुंभरे यांनी केले तर आभार प्रदर्शन जयंत कुंभरे यांनी केले. कार्यक्रमाचे यशश्र्वीतेसाठी समुहीक वनहक्क व्यवस्थापन समिती, तरुण पर्यावरणवादी मंडळ, महिला मंडळ, शाळेचे विद्यार्थी यांनी अथक परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here