बिबट्याला जेरबंध करण्यास वनविभाग कराडला यश

0
366

मागील काही दिवसांपूर्वी येनके गावात उसाच्या शेतात एका चार वर्षाच्या मुलाचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याची घटना उघड़किस आली होती. त्या बिबट्याला
वनविभाग कराड यांनी लावलेल्या सापळ्यात येणके ता.कराड येथे आज दि. 27 नंवबर 2021 रोजी सकाळ च्या सुमारास जेरबंध करण्यास वनविभागा यश मिळाले.

सदर बिबट्यास वैद्यकीय तपासणी करून पुणे जिल्ह्यातील , जुन्नर जवळ असलेल्या माणिक डोह बिबट्या निवारण केंद्र येथे वनविभागा कडून हलविण्यात आले आहे.
सदर बिबट्या मादी असून अंदाजे वय 2.5 ते 3 वर्ष आहे.
कराडचे परिक्षेत्र अधिकारी तुषार नवले व इतर वन कर्मचारी हे बिबट्या सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या रेस्क्यू कॅनटर मधून घेऊन रवाना झाले आहेत.
आज येणके येते उपवनसंरक्षक सातारा महादेव मोहिते, सहायक वनसंरक्षक महेश झंजुरणे, मानद वन्यजीव रक्षक रोहन भाटे यांनी भेट देऊन पाहणी केली असून अजून ही एक बिबट्या सदर परिसरात आहे त्या परिसराची पहाणी करून वन कर्मचारी याना सूचना व गावकरी , सरपंच इतर सदस्य यांना मोलाच्या सूचना केल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here