सिंधुदुर्ग जिल्ह्यात वाघाचे दर्शन ; वाघाने केले पाळीव जनावरांची शिकार

0
432


सिंधुदुर्ग जिल्ह्यात सावंतवाडी वन विभागाने लावलेल्या कॅमेरा ट्रॅप मध्ये दिनांक 26 नोव्हेंबर 2021 व 27 नोव्हेंबर 2021 रोजी कॅमेरा ट्रॅप मध्ये एका पाळीव जनावरांची केलेली शिकार खाताना वाघाचे छायाचित्र कॅमेरा ट्रॅप मध्ये टिपले गेले.

काही दिवसांपूर्वी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये दुर्मिळ प्रजाती तील काळा बिबट आढळून आला होता व आता वाघाच्या दर्शनाने या जिल्ह्यात असणाऱ्या समृद्ध जैविक विविधतेचे दर्शन दिसून येत आहेत. वाघ प्राणी परिसंस्थेच्या सर्वोच्च स्थानावर असलेला प्राणी आहे व तो परिपूर्ण जंगलाचे प्रतीक म्हणून ही बघितला जातो.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील या वनवैभवाचे संरक्षण व संवर्धन होण्यासाठी जिल्ह्यातील सर्व नागरिकांना वनविभागामार्फत आव्हान करण्यात येते की आपल्या पाळीव प्राण्यांचे वन्यप्राण्यांकडून शिकार झाल्यास आपण तातडीने वन विभागाची संपर्क साधावा जेणेकरून शासना मार्फत नमूद केले प्रमाणे नुकसान भरपाई घेता येईल. आपला हा समृद्ध वन वासरा जोपासण्यास सावंतवाडी वन विभागाचे सह आपण सर्व नागरिक ही कटिबद्ध आहोत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here