वन फुले वेचण्यास गेलेल्या इसम वाघाच्या हल्ल्यात ठार

0
57

यश कायरकर (जिल्हा प्रतिनिधी):
ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या बफर झोन अंतर्गत मूल मार्गावरील लोहरा जंगलात पट्टेदार वाघाच्या हल्ल्यात इसम ठार.
सदर घटना ही 28 एप्रिल 2023 रोजी शुक्रवारी सकाळी 9.30 वाजताच्या सुमारास उघडकीस आली. मृतकाचे नाव पुरुषोत्तम बोपचे वय (40) असे असून तो इंदिरा नगर येथील रहिवासी आहे व  पुरुषोत्तम स्थानिक MEL पोलाद कारखान्यात सुरक्षा रक्षक म्हणून कार्यरत होता.
सकाळच्या सुमारास पुरुषोत्तम वन फुले वेचण्यासाठी लोहारा जंगलात गेला होता बराच वेळ झाला तरी तो घरी परत न आल्याने  त्याच्या पत्नीने घरा शेजारी असलेल्या पतीच्या मित्रासोबत शोध घेतले तेव्हा जंगलात  त्याचे मृतदेह मिळाला. त्याची माहिती वन विभागाला मिळताच घटनास्थळी दाखल झाले व मौका पंचनामा केला व पुढील कारवाही करीत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here