Google search engine
Home Tourism ताडोबामध्ये स्थानिकांसाठी स्वस्त सफारीची संधी; कॅमेरा शुल्क रद्द, ग्लास वॉटर बॉटल मोफत

ताडोबामध्ये स्थानिकांसाठी स्वस्त सफारीची संधी; कॅमेरा शुल्क रद्द, ग्लास वॉटर बॉटल मोफत

0
969

चंद्रपूर (मोहम्मद सुलेमान बेग) :

ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प (TATR) ला भेट देऊ इच्छिणाऱ्या चंद्रपूर जिल्ह्यातील स्थानिक पर्यटकांसाठी आनंदाची बातमी आहे. स्थानिकांना आता सफारीसाठी विशेष सवलतीच्या दरात संधी उपलब्ध होणार आहे.

नवीन निर्णयानुसार, क्रुझर वाहनातून सफारीसाठी प्रति व्यक्ती फक्त ₹720 शुल्क आकारले जाणार असून या मध्ये कॅमेरा चार्जेसचा समावेश आहे.
बुकिंगची सुविधा वनविभागाचे उपसंचालक (कोर), TATR कार्यालय, मुल रोड, रामबाग फ़ॉरेस्ट कॉलनी, चंद्रपूर येथे उपलब्ध करून देण्यात आली आहे.
या निर्णयामुळे ताडोबाला भेट देणाऱ्या स्थानिक पर्यटकांना मोठा दिलासा मिळणार आहे. आतापर्यंत महागड्या शुल्कमुळे अनेक कुटुंबे व तरुण वंचित राहत होते, मात्र आता त्यांना वाघ निरीक्षण व जंगल सफारीचा आनंद घेण्याची संधी मिळणार आहे.

ए.आर. गोंड, वनपरिक्षेत्र अधिकारी, मोहर्ली (कोर) यांच्या माहितीनुसार, ताडोबामध्ये मोहर्ली गेटवर 4 आणि कोलारा गेटवर 3 क्रुझर वाहने उपलब्ध आहेत. या वाहनांची तिकीट बुकिंग सुविधा सध्या फक्त चंद्रपूर येथील उपसंचालक (कोर) कार्यालयात दिली जात आहे. याशिवाय प्रत्येक बुकिंग स्लिप सोबत एक ग्लास वॉटर बॉटल मोफत देण्यात येणार आहे आणि कॅमेरा शुल्क पूर्ण पणे रद्द करण्यात आले आहे. यापूर्वी कॅमेरा स्लिपसाठी ₹250 आकारले जात होते, ज्यामुळे सफारी गेटवर लांबच लांब रांगा लागत व पर्यटकांना सफारीत जाण्यास उशीर होत असे. आता हा त्रास कायमचा दूर झाला आहे.

काहींचे म्हणणे आहे की ताडोबा सफारी दर वाढविण्यात आले आहेत. मात्र प्रत्यक्षात दरवाढ फक्त FD कोटा (मॅनेजमेंट कोटा) मध्ये करण्यात आली आहे. यामुळे जीप्सी दरात ₹300 आणि गाईड शुल्कात ₹100 वाढ करण्यात आली आहे. कारण FD कोट्याचा लाभ प्रामुख्याने चंद्रपूर बाहेरील पर्यटक घेतात, त्यामुळे याचा परिणाम स्थानिकांवर होणार नाही. इतर सफारी तिकिटांमध्ये जी किरकोळ वाढ झाली आहे, ती कॅमेरा शुल्क माफ करून व एक सुंदर ताडोबाचा नावं प्रिंट असलेला एक ग्लास वॉटर बॉटल RO पाणी सोबत मोफत देऊन भरून काढण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here